नोटांवर लक्ष्मी, गणपतीचा फोटो छापण्याच्या मागणीवर केजरीवालांना भाजपनं घेरलं

नोटांवर लक्ष्मी, गणपतीचा फोटो छापण्याच्या मागणीवर केजरीवालांना भाजपनं घेरलं

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यावर भाजपने केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका केली आहे. यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल यांचे राजकारण यू-टर्न घेत असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. संबित पात्रा केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, ज्यांनी अयोध्येत राम मंदिरात जाण्यापासून नकार दिला. त्यांनी असा दावा केला होता की, श्री राम अयोध्येत करण्यात येणाऱ्या प्रार्थना स्वीकारत नाहीत. तसेच केजरीवाल असेही म्हणाले होते की, कश्मिरी पंडित खोटं बोलतात. संबित पात्रा यांनी केजरीवाल यांना त्यांच्याच वक्तव्यांची एक प्रकारे आठवण करुन दिली आहे.

केजरीवाल यांचे राजकारण बदलतंय

भाजप नेते संबित पात्रा यांनी केजरीवाल यांचे राजकारण बदलत असल्याची टीका केली आहे. अरविंद केजरीवाल काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, जर दिवाळी साजरी केली तर जेलमध्ये टाकण्यात येईल आणि आज तेच केजरीवाल नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापण्याचे वक्तव्य करताना दिसत आहे. दिवाळी लक्ष्मी आणि गणपतीचं पर्व आहे. यामुळे दिवाळीत आता जेलमध्ये टाकणारे केजरीवाल आज फोटो छापण्याबद्दल बोलत आहेत. त्यांचे राजकारण आता यू- टर्न घेताना दिसत आहे.

आम आदमी पार्टी भाजपची बी टीम

केजरीवाल यांच्यावर काँग्रेसकडूनसुद्धा टीका करण्यात आली आहे. भाजप आणि आरएसएसची आम आदमी पार्टी बी टीम असल्याची टीका काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी केली आहे. मतांसाठी हे राजकारण सुरु आहे. जर ते पाकिस्तानला जात असते तर त्यांनी आपण पाकिस्तानी आहोत त्यामुळे मला मतदान करा अशी मागणी केली असती. अशा शब्दात केजरीवाल यांच्यावर काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांनी केली असती.

अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापण्याची मागणी केली. केजरीवाल म्हणाले की, मी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की, त्यांनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापावा. जर इंडोनेशियामध्ये असे होऊ शकते तर भारतामध्ये असे का नाही होऊ शकत अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.


हेही वाचा : शरद पवारांवर टीका करण्याची तुमची उंची नाही, निलेश लंकेंचं विखे पाटलांना प्रत्युत्तर

First Published on: October 26, 2022 4:09 PM
Exit mobile version