2024 ला ‘ठाकरेंची शिवसेना’ भाजपसोबत जाणार का? संजय राऊतांनी दिलं उत्तर

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहे. या यात्रेत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्यासोबत कडाक्याच्या थंडीतही पायी प्रवास केला. याच यात्रेदरम्यान संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होऊ शकते, एकनाथ शिंदे भाजपासोबत सरकार स्थापन करु शकतात. तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व काही शक्य होऊ शकत अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. यावर एका वृत्तवाहिनीने 2024 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

ज्यावर उत्तर देत संजय राऊत म्हणाले की, असे भाकितं वर्तवली, कोणी काही बोललं तरी माझा या सर्व भाविष्यावर या क्षणी विश्वास नाही, काल नरेंद्र मोदी आले होते. ज्या भाजपने आमची शिवसेना फोडली अन् त्या फुटीचे समर्थन करत आहेत. ज्यांना भाजपने मांडीवर घेतलं आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या पक्षाचे चिन्ह, नाव नष्ट करण्याचा अफजलखानी विडा उचलला आहे, असे मोदींच्या व्यासपीठावर होते. तर अशा लोकांबरोबर आम्ही पुन्हा जावं असा प्रश्न कसा पडू शकतो, हा आमच्या अस्मितेचा आणि भावनेचा प्रश्न आहे, असं म्हणत राऊतांनी पुन्हा भाजपसोबतच्या युतीचे संकेत फेटाळले आहे.

शिवसेना संपवण्याचे त्यांना स्वप्न पडले आहे. ते शक्य नाही. आम्ही शून्यातून उभे राहू आणि पुन्हा एकदा आकाशात झेप घेऊ एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. सध्या वरवरची हवा आहे. ती हवा जाईल, असही राऊत म्हणाले.

काँग्रेस वाचून पर्याय नाही

सरकारच्या विरोधात विरोधी आघाडी उभी करायची असेल तर काँग्रेस वाचून पर्याय नाही. मी तुरुंगात असताना राहुल गांधी माझी चौकशी करत होते, देशाची आणि काळाची गरज आहे सर्वांनी एकत्र राहावे. कोणी कितीही म्हटलं तरी काँग्रेसशिवाय ऐक्य शक्य नाही, असही राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधान

भाजप हे आमच्यासमोरचं आव्हान नाही. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी अनेक राज्यात जात आहेत. ते भाजपचे पंतप्रधान आहेत, भाजपने त्यांना पक्षापुरते मर्यादित केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान आहेत. फक्त काँग्रेसचे नव्हते, इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री होत्या, असे अनेक उदाहरने आहेत. नरेंद्र मोदींनी देशाचे नेतृत्त्व केले पाहिजे त्यांनी फक्त एका पक्षाचे नेतृत्त्व करु नये, अशी टीकाही संजय राऊत पंतप्रधान मोदींवर केली आहे.


देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमांना गैरहजेरी का? पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

First Published on: January 20, 2023 2:43 PM
Exit mobile version