‘मुंबई पोलिसांविरोधात हे षडयंत्र’, संजय राऊतांची सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टाने आज हा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं. यावर बोलताना मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला, मुंबई पोलिसां विरोधात हे षडयंत्र असल्याची प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी दिली.

मुंबई पोलिसांनी योग्य दिशेनेच प्रवास कला आहे. पण हे मुंबई पोलिसांविरोधात षडयंत्र रचण्यात आलं आहे. यामुळे राज्याची बदनामी झाली आहे. राज्याची अशी बदनामी करणं आयोग्य आहे. कायद्यापुढे कोणीही मोठं नाहीये, निकालपत्र हाती आल्याशिवाय बोलणार नाही. अशी प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर बोलताना दिली.

सुशांतचे कुटुंबिय आणि त्यांचे चाहते बरेच दिवसांपासून सीबीआय चौकशीची मागणी करत होते. बिहारमध्ये नोंदविण्यात आलेली एफआयआर सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. तसेच, मुंबई पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने सांगितले की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास न करता फक्त चौकशी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे.

प्रकरणात आदित्य ठाकरेंचेही नाव…

सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे. गेले काही दिवस विरोधकांकडून आदित्य ठाकरेंवर टीका केली जात आहे. आत्महत्येच्या आधी सुशांतच्या घरी झालेल्या पार्टीत आदित्य ठाकरेंची उपस्थिती होती असा दावा विरोधकांनी केला आहे.

First Published on: August 19, 2020 12:26 PM
Exit mobile version