सपनाचा ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल

सपनाचा ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल

डान्सर सपना चौधरी

हरियाणी डान्सर आणि सिंगर सपना चौधरी राजकारणावरून पुन्हा चर्चेत आली होती. सपनाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. यानंतर आता सपनाचा एका नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सपना “टल्ली होकर नाचेंगे” या गाण्यावर नाचते आहे. या व्हिडिओला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. सपना चौधरीही तिच्या नाच गाण्यासाठी उत्तरे कडील राज्यात प्रसिद्ध आहे. सपना निवडणूक लढवणार अशी बातमी प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. मात्र काही वेळाने सपनाने पत्रकार परिषद घेऊन धक्का दायक खूलासा केला होता.

काँग्रेसने सादर केले होते पुरावे

डान्सर गायक सपना चौधरीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यावेळी सपनाचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले. सपना भाजप खासदार आणि जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या विरोधात लढणार असल्याची चर्चा होती. मात्र काही वेळातच सपनाने माघार घेतल्यामुळे काँग्रेसची नाचक्की झाली. सपनाने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातमीला खोटे सांगितले. मात्र सपनाने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे पुरावे काँग्रेसने दाखवले होते. याचबरोबर सपनाने ज्या ड्रेसमध्ये पत्रकार परिषद घेतली होती त्याच ड्रेसमध्ये असलेले तिचे फोटो सोशल मीडियावर आले. या फोटोमध्ये सपना भाजप खासदार मनोज तिवरी यांच्या सोबत दिसत होती. त्यामुळे सपना नक्की राजकारण कोणते करते आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

First Published on: March 25, 2019 11:14 AM
Exit mobile version