पंतप्रधानांच्या हस्ते होणार स्टॅच्यू ऑफ युनिटीचे अनावरण

पंतप्रधानांच्या हस्ते होणार स्टॅच्यू ऑफ युनिटीचे अनावरण

स्टॅच्यू ऑफ युनिटी

संपूर्ण देश आज भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३ वी जयंती साजरी करत आहे. जगातील सर्वांत उंचीचे आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे आज अनावरण होणार आहे. गुजरातमध्ये १८२ मीटर उंचीचा सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. लोखंड, तांबे यांच्या मिश्रणातून पुतळा तयार करण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातील इतर राज्याचे मुख्यमंत्री आणि नेतेमंडळी उपस्थिती लावणार आहेत.

थोड्याच वेळात होणार अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मंगळवारीच अहमदाबाद येथे आले आहेत. जगातील सर्वात उंच पुतळा असणाऱ्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावर पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहेत. पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी नरेंद्र मोदी नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर जवळील केवडिया कॉलनीमध्ये मोदी जाणार आहेत.

दिल्लीत रन फॉर यूनिटीचे आयोजन

दिल्लीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ‘रन फॉर यूनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ‘रन फॉर यूनिटी’ ला हिरवा झेंडा दाखवला. मोठ्या संख्येने दिल्लीकर या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. दरम्यान जिमॅस्टिक दीपा करमाकरसह अनेक खेडाळूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग दर्शवला आहे.

मोदींनी ट्वीट करुन दिली श्रध्दांजली

गुजरातमध्ये सरदार पटेल यांच्या बहुचर्चित ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे. अनावरण करण्यापूर्वी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. संपूर्ण देशाला एकतेच्या सूत्रामध्ये बांधून ठेवणारे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी नमन.

First Published on: October 31, 2018 9:43 AM
Exit mobile version