बापरे! अचानक एक्सप्रेसचे झाले दोन भाग, १५ डबे इंजिनशिवाय रुळावरून धावले…

बापरे! अचानक एक्सप्रेसचे झाले दोन भाग, १५ डबे इंजिनशिवाय रुळावरून धावले…

बिहारमध्ये एका एक्सप्रेस ट्रेनचे अचानक दोन भाग झाले आणि यातील १५ डब्बे रुळावर धावत राहिले तेही इंजिनशिवाय.

Satyagrah Express Train Accident: बिहारमध्ये एका एक्सप्रेस ट्रेनचे अचानक दोन भाग झाले आणि यातील १५ डब्बे रुळावर धावत राहिले तेही इंजिनशिवाय. ही घटना घडली सत्याग्रह एक्सप्रेससोबत. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मुझफ्फरपूर-नरकटियागंज रेल्वे सेक्शनवरील बेतिया मजहौलिया स्टेशनजवळ सत्याग्रह एक्सप्रेस ट्रेनचे १५ डबे इंजिनपासून वेगळे झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच पूर्व मध्य रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत प्रवाशांच्या जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

सत्याग्रह एक्सप्रेस सकाळी ९.३८ च्या सुमारास माझौलिया-बेतिया रेल्वे मार्गाच्या महोदीपूरजवळ आली होती. यावेळी दोन कोचला जोडणारी कपलिंग अचानक निघाली. यामुळे आर्धी गाडी मधूनच वेगळी होऊन पुढे निघून देली आणि आर्धी मागेच राहिली. सत्याग्रह एक्स्प्रेस इंजिन आणि ७ डब्ब्यांसह वेगळी होऊन सुटली, उर्वरित मागचे १५ डब्बे इंजिनशिवाय रेल्वे रुळावर धावू लागले. घटनेची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ७ डब्बे असलेले इंजिन २०० मीटर पुढे सरकल्यानंतर चालकाला याची माहिती मिळाली. घटना कळल्यानंतर लगेचच चालकाने आपत्कालीन ब्रेक लावून इंजिनसह चार डब्बे थांबवले. त्यानंतर पुन्हा सर्व डब्बे जोडून रेल्वेचे कामकाज सुरू करण्यात आले. चालकाच्या सावधगिरीमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

यादरम्यान रेल्वे गेटजवळ सुमारे १५ मिनिटे उभी होती. या प्रकरणावरून प्रवाशांनीही गोंधळ घातला. सत्याग्रह एक्सप्रेस ट्रेन रक्सौलहून आनंद बिहार टर्मिनलकडे जात होती. या घटनेनंतर आजूबाजूचे लोकही जमा झाले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. बेतिया रेलचे डीएसपी पंकज कुमार यांनी सांगितले की, तांत्रिक समस्येमुळे ट्रेनचे दोन भाग झाले. अर्ध्या तासात दोन्ही भाग जोडले गेले. ट्रेनही सुरू झाली आहे.

First Published on: February 2, 2023 12:52 PM
Exit mobile version