सौदी अरेबिया-पाकिस्तानदरम्यान २० अब्ज डॉलर्सचा करार

सौदी अरेबिया-पाकिस्तानदरम्यान २० अब्ज डॉलर्सचा करार

सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान

भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाची स्थिती असताना सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान हे सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानचे सर्व लक्ष सध्या त्यांच्या स्वागत तयारीवर आहे. आर्थिक संकटामध्ये असलेल्या पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून मदतीची आशा आहे. यासाठी मोहम्मद बिन सलमानला खुष करण्याचे प्रयत्न पाकिस्तान सरकार कडून केले जात आहेत. मोहम्मद बिन सलमान यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये २० अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी प्रसार माध्यमांकडून मिळत आहेत. या करारामध्ये अनेक महत्वाचे प्रोजेक्ट आहेत. या प्रकल्पात ८ अब्ज डॉलर्सला तेल शुद्धीकरण प्रकल्पाचाही समावेश आहे. मोहम्मद सलमान यांच्या दौऱ्याला एक दिवस उशीराने सुरुवात झाली होती.


काय म्हणाले बिन सलमान 

“भविष्यात पाकिस्तान हा एक महत्वाचा देश ठरणार आहे. आम्ही देखील पाकिस्तानच्या प्रगतीत सहभागी होऊ. सौदी अरेबिया येत्या काळात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक पाकिस्तानमध्ये करत आहे. गुंतवणूकीची संख्या प्रत्येकवर्षी वाढणार आहे.” – सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान

स्वागतावर लक्ष केंद्रीत

सौदी अरेबियाचे राजपुत्र पाकिस्तान दौऱ्यावर येणार म्हणून पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. बिन सलमान  पाकिस्तानच्या विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती असली तरीही पाकिस्तानने आपले सर्व लक्ष बिन सलमानच्या स्वागतावर होते. जागतिक बँकेकडून मदत निधी बंद झाल्यावर आता पाकिस्तान चीन आणि सौदी अरेबियावर अवलंबून आहे.

First Published on: February 18, 2019 10:24 AM
Exit mobile version