सौदी अरब विमानतळावर ड्रोन हल्ला, ८ जण जखमी

सौदी अरब विमानतळावर ड्रोन हल्ला, ८ जण जखमी

प्रातिनिधिक फोटो

सौदी अरबमध्ये विमानतळावर ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ८ जण जखमी झाले असून एका प्रवासी विमानाचेही नुकसान झाले आहे. येमेन मधील हूती बंडखोरांविरोधात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान हा हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, हा हल्ला कोणी केला हे अद्याप समजलेले नाही.

येमेनमधील हूती बंडखोर आणि सौदी अरबच्या सैनिकांमध्ये युद्ध सुरू आहे. याचदरम्यान, २४ तासातला हा दुसरा हल्ला आहे. येमेनमध्ये ईराणसमर्थित शिया बंडखोर आणि सौदी अरब लष्कर यांच्यात अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. हूती बंडखोरांनी सैनिकी तळांना लक्ष्य केलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळही बंडखोरांच्या निशाण्यावर आहे. हूती बंडखोर येमेनच्या राजधानी सनावर कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. एकीकडे अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्याने दहशतवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच काहीसे चित्र सौदीमध्ये पहावयास मिळत आहे.

 

 

First Published on: August 31, 2021 6:01 PM
Exit mobile version