माता नव्हे वैरीण! आईनेच दीड वर्षाच्या बाळाला दगडावर आपटून मारले

माता नव्हे वैरीण! आईनेच दीड वर्षाच्या बाळाला दगडावर आपटून मारले

केरळच्या कन्नूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षाच्या बाळाला समुद्रकिनाऱ्यावरील खडकावर आपटून निर्घुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २२ वर्षीय सरन्या या महिलेला अटक करण्यात आली असून चौकशी दरम्यान तिने मुलाची हत्या का केली, याचे कारण देखील सांगितले आहे. मात्र, हे कारण ऐकून तुम्हालाही राग येईल, असे कृत्य या मातेने केले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; सरन्या, असे या महिलेचे नाव असून तिने अनैतिक संबंध लपवण्यासाठी मुलाची खडकावर आपटून हत्या करुन नंतर मुलाचा मृतदेह समुद्रात फेकून दिल्याचे समोर आले आहे. समुद्र किनाऱ्यावर चिमुकल्याचा मृतदेह आढळल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

असा उघडकीस आला गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सरन्या कन्नूरमध्ये राहते. तिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, तिचे पती प्रणवसोबत पटन नसल्याने ती त्याच्यापासून वेगळी राहत होती. दरम्यान, मुलाला भेटण्यासाठी प्रणव घरी आला होता. मात्र, मुलगा घरी नव्हता. त्यामुळे पतीला संशय आला, त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे पत्नी सरन्याने मुलाच्या गायब होण्यामागे पतीचा म्हणजेच प्रणवचा हात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली. त्यावेळी दोघांकडून वेगवेगळी माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी या दोघांची उलट तपासणी करण्यास सुरुवात केली. कसून चौकशी केली असता सरन्याने आपण गुन्हा केल्याची कबुली दिली. सरन्याचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. त्याच्यासोबत राहण्यासाठी तिने मुलाची हत्या केल्याची कबुली देत गुन्हा मान्य केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; समुद्र किनारी सरन्याचे घर आहे. प्रणव मुलाला भेटण्यासाठी घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने आपल्या दीड वर्षाच्या मुलाला घराबाहेर नेले. त्याला मारण्याच्या हेतूने तिने त्याला समुद्राच्या पाण्यात फेकले. मात्र, त्यानंतर बाळ रडू लागल्याने त्याला तिने पुन्हा जवळ केले आणि त्याला समुद्रकिनारी असलेल्या खडकावर आपटले. यामध्ये बाळाच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यात बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालानुसार समोर आली आहे.


हेही वाचा – स्वेच्छानिवृत्तीनंतर ‘बीएसएनएल’ मध्ये मेगाभरती


 

First Published on: February 20, 2020 3:00 PM
Exit mobile version