तरुणाच्या ‘जीन्स’मध्ये घुसला ‘विषारी साप’ अन्….!

तरुणाच्या ‘जीन्स’मध्ये घुसला ‘विषारी साप’ अन्….!

तरुणाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'विषारी साप' अन्....!

विजेचे पोल लावणार एक मजूर झोपायला गेला आणि तेव्हा त्याच्या शर्टमधून त्यांच्या पँटमध्ये एक विषारी साप घुसला. यामुळे त्या मजुराला जाग आली आणि त्याला ही गोष्ट कळल्यावर त्याने संपूर्ण रात्र एका खांबला धरून काढली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात घडली आहे.

या मजूर तरुणाने गडबड झाल्यावर साप चावेल या भीतीपोटी तो रात्री १२ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची हालचाल न करता खांब धरून राहिला. मिर्झापूर जिल्ह्याच्या जमालपूर पोलीस ठाण्यात हद्दीत ही भयानक घटना घडली. परिसरात विजेचे पोल बसवण्याचे आणि वायर जोडण्याचे काम करणारे विद्युत विभागाचे मजूर एका अंगवाडी केंद्रात थांबले होते. रात्रीचा जेवण झाल्यावर सर्व मजूर झोपले. यादरम्यान झोपेत असताना मजूर लवलेश कुमारच्या शर्वमधून विषारी साप घुसला आणि त्यानंतर तो जीन्समध्ये गेला.

जेव्हा साप पँटमध्ये गेला तेव्हा मजूर तरुण उठला. मग तो जवळच्या खांबाला धरून स्तब्धपणे तब्बल ७ तास उभा राहिला. यावेळी विषारी साप त्याच्या पँटमध्ये बसूनच होता. पहाट झाल्यानंतर स्थानिक लोकांना सर्पमित्राला बोलावले आणि त्या मजूर तरुणाच्या पँटमधून तो साप बाहेर काढला आणि त्याचा जीव वाचला. गावातील लोकांनी सांगितले की, ‘या घटनेच्या वेळी प्रचंड गर्दी झाली होती. या दरम्यान तो साप त्या तरुणाला चावला नाही. तरुणाचे नशीब चांगले आहे.’

पंचायत सदस्य महेशसिंग म्हणाले की, ‘रात्री मजूरच्या शर्टमधून साप त्याच्या पँट घुसला. रात्री १२ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत मजूर खांबाला धरून उभा होता. सकाळी सर्पमित्राला बोलवण्यात आले, मग सापाला बाहेर काढण्यात आले. त्यावेळी लोकांची खूप गर्दी होती.’


हेही वाचा – तीन बळी घेणारा बिबट्या नर असल्याचा अहवाल प्राप्त


 

First Published on: July 28, 2020 11:40 PM
Exit mobile version