खुशखबर! SBIच्या खातेधारकांना २ लाख रुपयांचा फायदा, लवकरच येणार नवी स्किम

खुशखबर!  SBIच्या खातेधारकांना २ लाख रुपयांचा फायदा, लवकरच येणार नवी स्किम

SBI Notification 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदासाठी मोठी भरती, ४० हजारांपेक्षा अधिक पगार, असा करा अर्ज

SBIच्या खातेधारकांसाठी मोठी खुशखबर आहे. SBI लवकरच खातेधारकांसाठी लवकरचं एका नवीन स्किम सुरु होणार आहे. जर तुमचे जनधन अकाउंट आहे किंवा तुम्ही जनधन अकाउंट सुरु करणार असाल तर या प्लॅनचा तुम्हाला सर्वात जास्त फायदा होणार आहे. SBI खातेधारकांना तब्बल २ लाख रुपयांचा फायदा करुन देणार आहे. SBI ने ट्विटच्या माध्यामातून ही माहिती खातेधारकांना दिली आहे. जर तुम्ही SBIच्या जनधन कार्डसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला २ लाख रुपयांपर्यंत दुर्घटना विमा मिळेल. त्यासाठी तम्हाला जनधन कार्ड ९० दिवसांत एकदा तरी स्वाइप करावे लागेल. त्यानंतर तुम्ही २ लाख रुपयांचा दुर्घटना विमा मिळवू शकता.


भारतातील नागरिकांना जनधन योजनेचा लाभ घेण्यासाठी वय वर्ष १० पूर्ण असणे गरजेचे आहे. तरचं तुम्ही जनधन खाते सुरु शकता. जनधन अकाउंट सुरु करण्यासाठी आधी तुमच्याकडे बेसिक सेविंग अकाउंट असणे गरजेचे आहे. तुमचे सेविंग अकाउंट हे जनधन अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाते. देशभरातील अनेक लोकांनी या जनधन योजनेचा लाभ घेतला आहे. ऑगस्ट २०२० पर्यंत तब्बल ४०.३५ करोड लोकांनी जनधन अकाउंट सुरु केल्याची माहिती मिळत आहे. या योजनेच्या अतर्गंत देशातील गरिब लोकांचे झिरो बॅलन्सवर बँकेत अकाउंट सुरु करण्यात येते. बँकेत, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रियकृत बँकेंत अकाउंट सुरु केली जातात.


हेही वाचा – आता भारतातही चार दिवसांचा आठवडा!

First Published on: February 10, 2021 8:27 AM
Exit mobile version