SBI चे एटीएम कार्ड लवकरच होणार बंद?

SBI चे एटीएम कार्ड लवकरच होणार बंद?

एटीएम

हल्ली आपण खिशात-वॉलेटमध्ये जास्त रोख रक्कम घेऊन फिरत नाही. कारण काय? तर आपल्याला नाक्या-नाक्यावर एटीएम स्थानके आपल्या सेवेसाठी रात्रदिन कार्यरत असतात. त्यामुळे सध्या बरेच लोक आपल्याजवळ पैसे ठेवण्याला प्राधान्य देत नाहीत. मात्र, आता हे एटीएम कार्ड देखील बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी एसबीआयने एटीएम कार्ड बंद करण्याची योजना आखली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी दिली आहे. त्यामुळे याचा फटका एसबीआयच्या ९० कोटी एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे.

एसबीआय लवकरच सर्व डेबिट कार्ड बंद करणार असून बँकेचे ग्राहक डिजिटल पेमेंट सेवेच्या माध्यमातून रोख रक्कम काढू शकणार आहेत. पुढील १८ महिने बँक या योजनेवर काम करणार आहे. देशातल्या डिजिटल पेमेंट सेवेला चालना देण्यासाठी एटीएम कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

याचा करु शकता वापर

एटीएम कार्ड बंद झाल्यानंतर एसबीआयचे ग्राहक योनोच्या माध्यमातून पैसे काढू शकतील. योनो एसबीआयचे अॅप आहे. या माध्यमातून ग्राहक अतिशय सोप्या पद्धतीने रक्कम काढू शकतील. यामुळे एटीएम कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळता येणार असून एटीएम कार्ड स्वत:जवळ बाळगण्याची भासणार नाही, असे बँकेने म्हटले आहे.

कशी काढाल रक्कम?

First Published on: October 31, 2019 1:34 PM
Exit mobile version