लॉकडाऊनमध्ये SBI च्या ग्राहकांना घेता येणार ‘या’ सुवीधांचा लाभ!

लॉकडाऊनमध्ये SBI च्या ग्राहकांना घेता येणार ‘या’ सुवीधांचा लाभ!

SBI Notification 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदासाठी मोठी भरती, ४० हजारांपेक्षा अधिक पगार, असा करा अर्ज

करोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनच्या दरम्यान बँका आणि आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत. एसबीआय,एचडीअफसी, कोटक महिंद्रा, या बँकासह त्यांच्या ग्राहकांना कॅश डिलिव्हरी करण्याची सुविधा देत आहेत. त्याचप्रमाणे एसबीआयच्या खातेदारकांसाठी खूषखबर आहे. एसबीआय बँक घरबसल्या ग्राहकांना सुविधा देणार आहे.

काय आहे स्टेटबँकेची सुवीधा

एसबीआयच्या ग्राहकांना आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम आणि शेवटच्या पाच ट्रान्झॅक्शनची माहिती घेता येणार आहे. बँकेने यासाठी खास आयव्हीआर सेवा सुरू केली आहे. त्याचप्रमाणे एसबीआय तुमच्या घरी कॅश पोहचवण्याची सुविधा देते. मेडिकल इमरजन्सीवेळी एसबीआय ग्राहकाला १००० रूपयांचे शुल्क आकारते. त्यामुळे एसबीआयचे ग्राहक या वेगळ्या सेवांचे लाभ घेऊ शकता.

असा करा सुविधांचा वापर

– बँकेच्या कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये १८००-४२५-३८०० किंवा १८००-११-२२११ वर फोन करा

– तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा

– रजिस्टर बेस्ट क्रमांकाच्या सेवेसाठी १ डायल करा.

– शेवटच्या पाच ट्रान्झॅक्शनसाठी पुन्हा १ डायल करा

– आयव्हीआरच्या माध्यमातून माहिती घेण्यासाठी १ डायल कार

आयव्हीआर सुवीधा केवळ बचत खातेधारकांसाठी आहे. तसेच यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक एकाच खातेधारकाच्या नावावर रजिस्टर असणं गरजेचं आहे.

First Published on: March 26, 2020 1:06 PM
Exit mobile version