सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीलाही मिळणार समान वाटा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीलाही मिळणार समान वाटा

प्रातिनिधिक छायाचित्र

वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलासोबतच मुलीलाही समान वाटा मिळण्याबाबत अनेक ठिकाणी बरेच वाद सुरु असतात. सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालानुसार यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीलाही समान वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंदू वारसा (दुरुस्ती) अधिनियम २००५ (Hindu Succession (Amendment) Act 2005) नुसार मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र वडिलांचा मृत्यू २००५ पुर्वी मृत्यू झाला असेल तर मुलींना हा अधिकार नाकारण्यात येत होता. आज झालेल्या सुनावणीत तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने पुर्वलक्ष्यी प्रभावाने हा कायदा लागू होईल, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश अरुण मिश्रा हा ऐतिहासिक निकाल देताना म्हणाले की, “प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलीला समान वाटा मिळालाच पाहीजे.” २००५ साली केंद्र सरकारने या कायद्यात बदल केले होते. मात्र २००५ नंतर जन्मलेल्या मुलींनाच या कायद्याचे लाभ मिळतील, असे बोलले जात होते. मात्र आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे हा कायदा २००५ पुर्वी जन्मलेल्या मुलीनांही लागू होत असल्याचे स्पष्ट केले.

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय आहे

हिंदू वारसा (दुरुस्ती) अधिनियम २००५ नुसार २००५ नंतर वडिल हयात होते की नव्हते याने कोणताही फरक पडणार नाही. ९ सप्टेंबर २००५ रोजी हयात असलेल्या सर्व मुलींसाठी हा कायदा लागू पडणार असून त्यांना वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलासारखा समान वाटा मिळणार आहे.

 

 

 

First Published on: August 11, 2020 1:39 PM
Exit mobile version