राजपथावर यंदा महाराष्ट्राची ‘संत परंपरा’ अवतरणार

राजपथावर यंदा महाराष्ट्राची ‘संत परंपरा’ अवतरणार

राजपथावर यंदा महाराष्ट्राची 'संत परंपरा' अवतरणार

भारताचा प्रजासत्ताक दिन दरवर्षी दिल्लीच्या राजपथावर साजरा करण्यात येतो. देशातील प्रत्येक राज्यातील संस्कृती इथल्या परेडमध्ये पहायला मिळते. आपल्या राज्याचे खास आकर्षक प्रत्येक राज्य सादर करत असते. यंदा २०२१च्या प्रजासत्ताक दिना दिवशी राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये एक खास आकर्षण पहायला मिळणार आहे. यंदा पथसंचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संत परंपरे’वर आधारित सुंदर आणि सुबक अशा चित्ररथाचे रुप पाहायला मिळणार आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात असून या पथसंचलनाची पूर्वतयारी म्हणून होणाऱ्या रंगीत तालमीसाठी चित्ररथ बांधणीच्या कामाने चांगलीच गतीही घेतली आहे.

या कलाकारांच्या कलेतून उभा राहणार चित्ररथ

राज्याच्या चित्ररथ बांधणीचे कार्य नागपूर येथील टीम करत आहे. सध्या चित्ररथ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरु असून या टीमचे प्रमुख राहुल धनसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या चित्ररथाचे संकल्पनाचित्र आणि त्रिमिती प्रतिकृती रोशल गुले (२४) आणि तुषार प्रधान (२३) या तरुण कलाकारांनी तयार केले आहे. विशेष म्हणजे कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ३० कलाकार हा आकर्षक चित्ररथ उभारत आहेत.

असा असणार चित्ररथ

महाराष्ट्राचा चित्ररथ कसा असणार याची सर्वांच उत्सुकता आहे. तर या चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फुटांची आसनस्थ मूर्ती असणार आहे. त्यांच्या मूर्तीसमोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी आठ फुटी उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोट्यवधी भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी ८.५ फूट उंचीची लोभस मूर्ती उभारण्यात आली आहे.


हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचं नाव आघाडीवर? 


 

First Published on: January 22, 2021 1:36 PM
Exit mobile version