गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिली स्वदेशी लस ‘CERVAVAC’ लवकरच बाजारात; सरकारच्या पॅनलने दिली मंजुरी

गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिली स्वदेशी लस ‘CERVAVAC’ लवकरच बाजारात; सरकारच्या पॅनलने दिली मंजुरी

महिलांचे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण करण्यासाठी पहिली क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस ही लस (qHPV) आता लवकरचं बाजारात उपलब्ध होणार आहे. केंद्राच्या औषध नियामक विषय तज्ञ समितीने या स्वदेशी लसीच्या बाजार अधिकृततेसाठी मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. ही लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आशा आहे की, या वर्षाच्या अखेरीस CERVAVAC बाजारात येऊ शकते.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी 8 जून रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून qHPV च्या बाजार अधिकृततेसाठी अर्ज केला होता. जैवतंत्रज्ञान विभागाच्या पाठिंब्याने क्लिनिकल चाचण्यांचे तीन पैकी दोन टप्पे पूर्ण केल्यानंतर ही लस देशात लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे.

CERVAVAC चाचणीत चांगले परिणाम

या अर्जात SII ने सांगितले की, qHPV  CERVAVAC लसीने मजबूत प्रतिपिंड प्रतिसाद दर्शविला. सर्व वयोगटातील स्त्रियांमध्ये सर्व HPV विषाणूंना अँटीबॉडी रिस्पॉन्सबेसलाइनपेक्षा 1000 पट जास्त असल्याचे आढळून आले आहे.
अधिकृत सूत्राने सांगितले की, “विषय तज्ञ समितीने बुधवारी अर्जावर विचार करताना, सीरम इन्स्टिट्यूटला गर्भाशय कर्करोगाविरूद्ध qHPV निर्मितीसाठी बाजार अधिकृतता देण्याची शिफारस केली.

अर्जामध्ये, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटले आहे की, दरवर्षी लाखो महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तसेच इतर काही कॅन्सरचा सामना करावा लागतो आणि यात मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. भारतातील गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा १५ ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे.

यात स्त्रियांच्या ग्रीवाच्या पेशींचे नुकसान होते. ग्रीवा हा गर्भाशयाच्या खाली असलेला छोटा भाग आहे. गर्भाशय ग्रीवामधील कॅन्सर हा सामान्यतः ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे होतो. भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची सुमारे 80-90 हजार प्रकरणे आढळतात, जी जगात सर्वाधिक आहे.


पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, मुंबईतील इंधनाचे दर जाणून घ्या


First Published on: June 16, 2022 8:17 AM
Exit mobile version