राफेल कागदपत्रांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात – केंद्रसरकार

राफेल कागदपत्रांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात – केंद्रसरकार

राफेल विमान ( फोटो सौजन्य - The Morung Express )

बहुचर्चित राफेल प्रकरणी आज केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. राफेल विमानाच्या कागदपत्रांमध्ये देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार असल्याचे या प्रतिज्ञा पत्रात म्हटलं आहे. आता या प्रकरणावर उद्या गुरुवारी दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे. राफेल विमानाबद्दल शत्रू राष्ट्रांना माहिती मिळू नये यासाठी ही कागदपत्रे जाहीर केली नसल्याचे सरक्षण खात्याकडून सांगण्यात आले.

काय म्हटलं आहे प्रतिज्ञापत्रात

याचिकाकर्त्यांनी संरक्षण मंत्रालयातील संरक्षण काराराशी संबंधित कागदपक्षांच्या गोपनीय फाइल्सची झेरॉक्स काढली की चोरी केली? हे कृत्य कराराचे नियम आणि गोपनीयेतेच्या अटींचा भंग करणारं आहे आणि गुन्हाही आहे असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई काय कारवाई केली पाहिजे असा प्रश्न न्ययाालयाला संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

First Published on: March 13, 2019 7:55 PM
Exit mobile version