स्वयंघोषित बाबा रामपालला जन्मठेपेची शिक्षा

स्वयंघोषित बाबा रामपालला जन्मठेपेची शिक्षा

स्वयंघोषित बाबा रामपाल

हरियाणातील सतलोक आश्रमाचा प्रमुख आणि स्वयंघोषित संत रामपाल याला अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या गुरूवारी हिसार जिल्हा सत्र न्यायालयाने संत रामपाल यांना दोन हत्येच्या प्रकरणांमध्ये दोषी असल्याचा निकाल दिला होता. त्यानंतर आज त्यावर शिक्षा सुनावण्यात आली असून संत रामपालसोबत १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सतलोक आश्रमाक उफाळलेल्या हिंसाचारात सहा महिला आणि एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

निकालाच्यावेळी कडेकोट बंदोबस्त 

विशेष न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संत रामपाल प्रकरणी सुनावणी केली होती. रामपाल जेल क्रमांक दोनमध्ये असून त्यांच्या सुनावणीसाठी जेल क्रमांक एकमध्ये कोर्ट स्थापन करण्यात आले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी हिस्सारमध्ये कडेकोट बंदोबस्ट ठेवला होता. बाबा राम रहीमच्या निकालानंतर पंचकुलात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. तर हिस्सार कोर्टाने रामपालची सरकारी कार्यात अडथळा आणणे आणि आश्रमात महिलानं जबरदस्तीने डांबून ठेवणे या दोन खटल्यातून मुक्तता केली होती. देशद्रोह आणि हत्येचा खटला त्यांच्यावर कायम होता. त्यावरच आजचा हा निकाल देण्यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण

हिस्सारमध्ये बाबा रामपालच्या सतलोक आश्रमात नरबळी गेल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानो रामपालच्या अटकेचे आदेश दिले होते. मात्र आश्रमात घुसून रामपालला अटक करण्यास नोव्हेंबर २०१४ मध्ये समर्थकांनी पोलिसांना जोरदार विरोध केला. त्यानंतर पोलीस आणि समर्थकांमध्येही संघर्ष झाला. यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले. अखेर पोलिसांनी तीन दिवसानंतर बाबा रामपालला अटक केली. आश्रमाच्या दारावर अॅम्ब्युलन्स नेऊन पोलिसांनी रामपालला थेट अॅम्ब्युलन्समधूनच नेलं. यावेळी त्यांच्या समर्थकांनी थेट पोलिसांवरच गोळीबार केला होता.

First Published on: October 16, 2018 1:12 PM
Exit mobile version