वृद्ध चोराला पाच गर्लफ्रेंड्स पडल्या महागात

वृद्ध चोराला पाच गर्लफ्रेंड्स पडल्या महागात

(फोटो सौजन्य - Zee News)

दिल्ली पोलिसांनी एका भामट्या चोराला अटक केली आहे. पण ही काही साधीसुधी अटक नाही. हा भामटा चोर गर्लफ्रेंडसाठी चोऱ्या करायचा! त्याही एक दोन नव्हे, तर तब्बल ५ गर्लफ्रेंड. पण या प्रकरणाची सर्वात विशेष बाब म्हणजे या भामट्याचे वय आहे ६३ वर्षे! बंधू सिंह (६३) असे या चोराचे नाव आहे. गर्लफ्रेंड्सचा खर्च भागवण्यासाठी तो चोऱ्या करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नुपूर प्रसाद यांनी दिली असून या वृद्ध चोराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

तरुण बनण्याची हौस

दिल्लीमधील आनंद पर्वत परिसरात बंधू सिंह राहायचा. त्यानी सांगितल की त्याचे संपूर्ण आयुष्य हे चोऱ्या करण्यात गेले. त्याला पाच गर्लफ्रेंड्स असून त्यांचा खर्च भागवण्यासाठी तो चोऱ्या करायचा. बंधू याला तरुण बनण्याची इतकी हौस की हा चोर आजही जीमला जातो आणि केस देखील काळे करतो. तसेच आपली हौस पूर्ण करण्यासाठी त्याने लग्न देखील केलेले नाही.

फॅक्टरीत चोरी

बंधू सिंह यांनी २८ जून रोजी एका फॅक्टरीत चोरी केली होती. त्यावेळी बंधू याचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लॅपटॉप, एक एलईडी टिव्ही आणि पाच हजार जप्त केले आहे.

First Published on: July 31, 2018 3:42 PM
Exit mobile version