उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून राहुल गांधींना साकडे, शशी थरूर यांचा दावा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून राहुल गांधींना साकडे, शशी थरूर यांचा दावा

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा जसजसा दिवस जवळ येतोय तसे रोज नवनवे खुलासे आणि आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असलेल्या शशी थरूर यांनी दावा केला आहे की, मी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना केली होती. निवडणुकीच्या प्रचारासाठी शशी थरुर आज केरळमध्ये गेले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

सर्वात जुन्या पक्षाला निवडणुकीत फायदा होणार असल्याने मी थरूर यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगणार नाही, असे राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांना सांगितले, असाही दावा थरुर यांनी केला होता. पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवावी, असे गेल्या 10 वर्षांपासून मी मागणी करत होतो असंही शशी थरुर म्हणाले.

मी मागे हटू नये, निवडणूक लढवावी, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, पक्षातील कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने मला सहकार्य करावं किंवा पाठिंबा द्यावा अशी मी कधीच अपेक्षा केली नाही, असंही शशी थरुर म्हणाले.

First Published on: October 4, 2022 7:36 PM
Exit mobile version