सुंदर मुलींच्या प्रोफाईलद्वारे करायचे सेक्सटॉर्शन, टोळीला अटक

सुंदर मुलींच्या प्रोफाईलद्वारे करायचे सेक्सटॉर्शन, टोळीला अटक

प्रातिनिधीक फोटो

सुंदर मुलींचे फेक फेसबुक प्रोफाईल बनवून सेक्सटॉरर्शन वसूल करणार्‍या एका टोळीला पोलिसांनी पकडले आहे. या टोळीचा म्होरक्यासुद्धा पोलिसांच्या हाती लागला आहे. आत्तापर्यंत या टोळीने २०० जणांना फसवले असल्याचे तपासात समोर आलं आहे.

मेवात भागातल्या सेक्सटॉरर्शन गँगची सोशल मीडियावर दहशत होती. अनेक जण या गँगच्या जाळ्यात अडकले होते. या गँगचे सदस्य फेसबुकवर सुंदर मुलींच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करायचे आणि लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचे. त्यानंतर त्या लोकांशी मैत्री करायचे आणि त्यांना गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवायचे. त्यानंतर त्यांचा नंबर घेऊन व्हॉटसपवरही गप्पा सुरु व्हायच्या.

First Published on: June 16, 2021 1:11 AM
Exit mobile version