एअर इंडियात महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रावर 4 महिन्यांची विमानप्रवास बंदी

एअर इंडियात महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रावर 4 महिन्यांची विमानप्रवास बंदी

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा याच्यावर एअर इंडियाने बंदी घातली आहे. एअर इंडियाने शंकर मिश्रा याच्यावर 4 महिन्यांची बंदी घातली आहे. शंकर मिश्रा हे चार महिने एअर इंडियाच्या फ्लाइटमधून प्रवास करू शकणार नाहीत.

एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची घटना 26 नोव्हेंबर 2022 रोजी घडली होती. मात्र महिन्याभरानंतर अखेरीस ती समोर आली. न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये घडलेल्या घटनेनंतर शंकर मिश्रा हा आरोपी फरार होता. दिल्ली पोलिसांनी त्याला 7 जानेवारी 2023 रोजी बंगळुरूमधून अटक केली. हा आरोपी मुंबई राहणारा असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो दारूच्या नशेत होता. त्यामुळे स्वत:वर नियंत्रण न राहिल्याने त्याच्या हातातून हे कृत्य झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

या घटनेच्या चौकशीसाठी एअर इंडियाने अंतर्गत समितीही स्थापन केली होती. तसेच, या प्रवाशाला ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याची शिफारसही करण्यात आल्याचे एअर इंडियाने सांगितले. त्यानुसार शंकर मिश्राच्या विमान प्रवासावर एअर इंडियाने बंदी घातली आहे. तथापि, इतर एअरलाइन्स कंपन्या देखील या घटनेची दखल घेण्याची शक्यता आहे.

शंकर मिश्राचे कानावर हात
न्यायालयात शंकर मिश्राने या घटनेाबाबत न्यायालयात कानावर हात ठेवले. मी ज्येष्ठ महिलेवर लघुशंका केलेली नाही. महिलेला शारीरिक त्रास आहे. तिनेच लघुशंका केली असावी, असा दावा विमान प्रवासात ज्येष्ठ महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राने दिल्ली न्यायालयात केला. चौकशीसाठी मिश्राची पोलीस कोठडी मिळावी यासाठी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यात वरीष्ठ वकील रमेश गुप्ता यांनी मिश्राची बाजू मांडली. ते म्हणाले, लघुशंका थांबवता न येण्याचा ज्येष्ठ महिलेला त्रास असावा. कथक करणाऱ्या महिलांना हा त्रास असतो. त्यामुळे ज्येष्ठ महिलेनेच विमान प्रवासात लघुशंका केली असावी किंवा लघुशंका करणारा दुसरा कोणी तरी असू शकतो. मिश्राने हे कृत्य केलेले नाही, असा दावा त्यांनी केला.

First Published on: January 19, 2023 10:18 PM
Exit mobile version