Happy Birthday Sharad Pawar : शरद पवारांचा ८१ वा वाढदिवस, पंतप्रधानांपासून ते दिग्गज नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

Happy Birthday Sharad Pawar : शरद पवारांचा ८१ वा वाढदिवस, पंतप्रधानांपासून ते दिग्गज नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज (रविवार) ८१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या संपूर्ण मर्यादांचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत हा कार्यक्रम नेहरू सेंटरमध्ये पार पडत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या असून पुष्पगुच्छ भेट देण्यात आलं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तम आरोग्य आणि शतायुषी होण्याच्या शुभेच्छा मोदींनी शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. असं ट्विट करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ठाकरे कुटुंबियांकडून सिलव्हर ओकवर पुप्षगुच्छ भेट देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण केलं असून आजही राजकारणात पवार हे तितकेच सक्रिय नेते आहेत. त्यामुळे ते आम्हालाही आणि तरूणांनाही लाजवतील कारण त्यांचं अखंड वाचन आणि चिंतन मी पाहत असतो. महाराष्ट्राने देशाला जे काही नेतृत्त्व दिलेलं आहे यामध्ये शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वोच्च आहेत. महाविकास आघाडीचा एक प्रयोग सुरू आहे. परंतु हा प्रयोग शरद पवार यांच्या सहकार्याशिवाय आणि भूमिकेमुळे शक्य नव्हता. त्यामुळे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राला आणि देशाला त्यांचं मार्गदर्शन सतत लाभत राहो. असं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कारकीर्द करताना आपल्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. पुढेही आपला स्नेह आणि आशीर्वाद असेच कायम राहो. अशा शुभेच्छा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत.

मुंंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

देशातही पवारांच्या नेतृत्त्वात एक आघाडी बनणार

शरद पवार साहेबांचे सर्व नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी होईल असं वाटलं नव्हतं पण ते झालं. परंतु देशातही पवारांच्या नेतृत्त्वात एक आघाडी बनणार आहे. जेव्हा जावयाला अटक झाली तेव्हा सकाळीच पवारांचा फोन आला म्हणजेच संकट आलं की ते नेहमी पाठिशी उभे राहतात. अशी भावना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

देशाचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान, लोकमान्य-राजमान्य नेतृत्वं असं ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा शरद पवारांच्या वाढिदिवसानिमित्त ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तम आरोग्य आणि दीर्घायुषी राहो, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

First Published on: December 12, 2021 12:10 PM
Exit mobile version