Mission Shakti: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानंतर शेअर मार्केटची प्रतिक्रिया

Mission Shakti: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानंतर शेअर मार्केटची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितले की, ”भारताने मिशम शक्ती अंतर्गत अंतराळातील ३०० किमी अंतरावरील सेटलाइट उधवस्त करण्याची यशस्वी कामगिरी केली आहे. भारताने अंतराळ क्षेत्रात केलेली आतापर्यंतची ही अत्यंत उल्लेखनीय कामगिरी आहे. अमेरिका, रशिया, चीन नंतर अंतराळात महाशक्ती ठरलेला भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. (LEO) लॉ अर्थ ऑरबिट या अंतराळातील ३०० किमी दूर असलेल्या सेटलाईट उपग्रहाला भारताच्या मिसाइल (A-SAT) ने मिशन शक्ती या मोहीमे अंतर्गत काही क्षणात वेध घेतला. या संशोधनामुळे भारताने अंतराळातील महाशक्तीचे प्रदर्शन केले आहे. आम्हाला भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीचा अभिमान आहे.”

या कामगिरीनंतर संपुर्ण शेअर मार्केटमध्ये तेजीचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये सेन्सेक्स १८७ अंकाने वाढ होऊन ३८,४२० अंकापर्यंत पोहचला. तर, निफ्टीमध्ये देखील ५० अंकानी वाढ झाली. यासोबतच, मध्यम स्तरातील कंपनीचा निर्देशांक (मिडकॅप इंडेक्स) ०.५ टक्क्याने वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ६८.९३ ने उचांक गाठला आहे. येस बॅंक, एसबीआय बॅंक, इंडसइंड बैंक आणि बजाज फायनान्सचे शेअर तेजीत असून ट्रेड करत आहेत. तसेच रिलायंस इंडस्ट्रीचे शेअर कोसळले आहे.

बीएसई १०० निर्देशांक ०.२७ टक्क्यांनी वाढला आहे. यस बँकेचे शेअर ५.६ टक्क्यांनी वाढून २६७ रुपये झाले आहे. इंडसइंड बँकेचे शेअर्स ४.३७ टक्क्यांनी वाढून १७९० रुपये झाले आहेत. एसबीआयचे शेअर्स १.९९ टक्के, बजाज फायनान्सचे १.८९ टक्के, अॅक्सिस बँकेचे शेअर्स १ टक्के आणि कोटक महिंद्राचे शेअर्स १ टक्क्यांपर्यंत वाढून तेजीत व्यवसाय सुरू आहे.

First Published on: March 27, 2019 2:02 PM
Exit mobile version