‘संजय राऊत हनुमान तर शरद पवार चाणक्य’

‘संजय राऊत हनुमान तर शरद पवार चाणक्य’

अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरें यांच्याबरोबर आणखी ६ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या महिनाभरापासून हे सत्तानाट्य सुरू होते. या एक महिन्यात महाराष्ट्राने अनेक राजकीय उतार- चढाव पाहिले. सध्या बॉलिवूड अभिनेते आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांचं ट्वीटही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महाराष्ट्रमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपीचं सरकार येण्याआधी शत्रुघ्न यांनी एक ट्वीट केलं. यात त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं भरभरून कौतुक केलं. ‘अपेक्षित, प्रतिक्षित आणि योग्य सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या दिवशी तसेच कौटुंबिक मित्र.. महाराष्ट्राची धूरा सांभाळण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे योग्य सुपूत्र उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन.’ यासोबतच त्यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांचं अभिनंदन केलं.

 

तर आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी लिहिले की, ‘हनुमान संजय राऊत मैदानात पाय घट्ट रोवून उभे होते. त्यांची ही कृती कौतुकास्पद आहे. चाणक्य, देशाचे नेता माननीय शरद पवार यांनाही शुभेच्छा. प्रतिष्ठित सुप्रिया सुळेही फार चर्चेत होत्या.’

First Published on: November 28, 2019 8:32 PM
Exit mobile version