उद्धव ठाकरे जाणार गांधीनगरला

उद्धव ठाकरे जाणार गांधीनगरला

उद्धव ठाकरे आणि अमित शाह

पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहाणार आहेत. अमित शाह यांनी इच्छा प्रकट केल्यानंतर उद्धव ठाकरे हे गुजरात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गुजरातच्या गांधीनगर येथून उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कापून शाह यांना उमेदवारी दिली आहे. शनिवारी गुजरातच्या गांधीनगर मधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

वरिष्ठ नेते राहणार उपस्थित

उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेत उपस्थित राहावे अशी अमित शाह यांनी इच्छा व्यक्त केली होती. तसेच उपस्थित राहण्याचे आमंत्रणही दिले होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अहमदाबादमध्ये शाह यांचे शक्तीप्रदर्शन. चार किलोमीटरची रथयात्रा. नरेनपुरा विधानसभा मतदारसंघापासून निघणार रथयात्रा. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचीही माहिती मिळत आहे

शाह यांची महत्वपूर्ण भूमिका

शिवसेना-भाजप युती पुन्हा होण्यासाठी अमित शाह यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यासाठी त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची मनधरणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन युतीची अधिकृत घोषणा त्यांनी केली होती. एनडीए मध्ये एक संदेश जावा यासाठी हा प्रयत्न असला तरी अडवाणी यांचा पत्ता कापल्याने एक प्रकारची भाजपा कार्यकत्यांमध्ये जी नाराजी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीने कमी होईल असाही अंदाज व्यक्त करत शाह यांनी ठाकरे यांना उपस्थित राहण्याची गळ घातल्याचे समजते.

First Published on: March 29, 2019 8:38 AM
Exit mobile version