सामना रद्द करण्याचा अधिकार भारताला आहे – शोएब अख्तर

सामना रद्द करण्याचा अधिकार भारताला आहे – शोएब अख्तर

शोएब अख्तर

मागील आठवड्यात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानचा पूर्व क्रिकेट खेळाडू शोएब अख्तर याने निषेध केला आहे. आयसीसी वल्ड कप २०१९ मध्ये भारताला पाकिस्तानसोबत खेळला जाणारा सामना रद्द करण्याचा अधिकार असल्याचे वक्तव्य केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ समोरासमोर आला आहे. हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत कोणताही संबध ठेवून नये असे वक्तव्य भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगूली, हरभजन सिंग यांनी केले होते. क्रिकेटमध्ये राजकारण करू नये असे शोएब म्हणाला आहे. या संबधी त्याने नुकतेच एक ट्विट केले आहे.


पंतप्रधानांना समर्थन

“खेळात राजकारण झालं पाहिजे? मुळीच नाही. भारताच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचे आम्हाला दुःख आहे. मात्र आमच्या देशात अजूनही एकी आहे. आमचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याचे मी समर्थन करतो.” – शोएब अख्तर

First Published on: February 22, 2019 9:04 AM
Exit mobile version