धक्कादायक:ऑक्सिजनसंबंधी संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा ऑक्सिजन अभावीच तडफडून मृत्यू !

धक्कादायक:ऑक्सिजनसंबंधी संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा ऑक्सिजन अभावीच तडफडून मृत्यू !

धक्कादायक:ऑक्सिजनसंबंधी संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा ऑक्सिजन अभावीच तडफडून मृत्यू !

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आपुर्‍य सोयी सुविधे अभावी अनेक कोरोनारुग्ण दगावत आहेत. तसेच अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्याप्रमाणात गरज भासत आहे. ऑक्सिजनच्या कमतरते अभावी चेन्नईमध्ये ऑक्सिजनसंबंधी संशोधन करणाऱ्या एका संशोधकाचा ऑक्सिजन अभावीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेऊन 44 वर्षीय डॉ. भालचंद्र काकडे हे चेन्नईमध्ये ऑक्सिजनसंबंधी विषयवार संशोधन करत होते. नुकताच त्यांच्या प्रयोगशाळेतील काही सहकार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर काकड यांनी खबरदारी बाळगत स्वत: ची कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार करण्यास सुरुवात केली होती. अचानक श्वास घेण्यास त्रास होताच त्यांना शासकीय कोरोना केंद्रात त्यांना दाखल करण्यात आलं होते. तिथे व्यवस्थित उपचार न मिळाल्याने काकड यांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली. आणि यामुळे त्यांना ऑक्सिजन अभावी मृत्युला सामोरे जावे लागले. ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या संशोधकालाच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे  प्राण गमवावे लागल्यामुळे नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. काकडे आणि त्यांची पत्नी चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात उच्चशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी संशोधनाचे काम सुरू केले होते. ऑक्सिजन, हायड्रोजन वायूंपासून इंधनपूरक ऊर्जा निर्माण करून त्यावर रेल्वेही धावू शकेल, असे संशोधनास त्यांनी सुरुवात केली होती. यापाठोपाठ त्यांनी सात पेटंटही मिळवलं होतं. एका उत्तम संशोधनकर्त्या ऑक्सिजनच्या कमतेरतेने मृत पावल्यामुळे दुख: व्यक्त केले जात आहे.


हे हि वाचा – Coronavirus:थ्रि इडियट स्टाईलमध्ये बाईकवर बसवून कोरोनारुग्णाला नेलं रुग्णालयात

First Published on: May 8, 2021 5:46 PM
Exit mobile version