‘बूट पॉलिश’ करणारा महिन्याला कमावतो १८ लाख!

‘बूट पॉलिश’ करणारा महिन्याला कमावतो १८ लाख!

प्रातिनिधिक फोटो

रेल्वे स्थानकांवर तसंच पादचारी पूलांवर बुट पॉलिश करणारे लोक आपण नेहमीच पाहतो. ऑफिसला जाणाऱ्या एखाद्या साहेबाच्या बुटांना चुटकीसरशी चकाचक करणारे हे ‘बुट पॉलिशवाले’ आपलं हमखास लक्ष वेधून घेतात. बुट पॉलिश करुन ही माणसं महिन्याला नक्की किती पैसै कमवत असतील असाही प्रश्न तुमच्या मनात कदाचित आला असावा. याचं नेमकं उत्तर ठाऊक नसलं तरी आपण अशा एका बुट पॉलिशवाल्याविषयी जाणून घेणार आहोत ज्याची महिन्याची कमाई तब्बल १८ लाख रुपये इतकी आहे. हा श्रीमंत बुट पॉलीशवाला अमेरिकेच्या मॅनहॅटन भागामध्ये तुम्हाला आढळतो. डॉन वार्ड असं त्याचं नाव असून बुट पॉलीश करुन तो महिन्याला १८ लाख रुपये कमावतो. मात्र, साधं बुट पॉलिशचं काम करणाऱ्या वार्डची कमाई इतकी कशी? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. दरम्यान १८ लाख रुपये कमावणाऱ्या वॉर्डनच्या उत्पन्नामागे एक गुपित आहे.

यासंदर्भात बोलताना स्वत: वार्ड म्हणतो, की ‘तुम्हाला जर मोठा मासा पकडायचा असेल तर, गळाला तितकेच चांगलेच आमिष लावावे लागते. मीदेखील श्रीमंत ग्राहकांना माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी असंच काही करतो. बुट पॉलीश करवून घेण्यासाठी जेव्हा माझ्याकडे लोक येतात, तेव्हा पॉलिशसोबतच मी त्यांचं पुरेपूर मनोरंजन करतो. मी त्यांना जोक्स हसवतो तर कधी गाणी गाऊन त्यांचा मूड रिफ्रेश करतो. इतकंच नाही तर त्यांना काही प्रोत्साहित करणाऱ्या आनंददायी टीप्सही देतो. शिवाय कधी कधी मी त्यांना कपड्यांच्या रंगसंगतीविषयीही सल्ले देतो. ज्यामुळे बहुतांशी ग्राहक खुष होऊन मला अधिक पैसे देतात आणि यातूनच बुट पॉलिश व्यतिरिक्त माझी अतिरिक्त कमाई होते.’

प्रातिनिधिक फोटो (सौ-सोशल मीडिया)

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, डॉन वॉर्ड त्याच्या ग्राहकांना खूष करण्याच्या या कलागुणांमुळे, एका दिवसात साधारण ९०० डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे ६० हजार रुपयांची कमाई करतो. त्यामुळे एक महिन्याच्या हिशोबाने वार्डची साधारण कमाई सुमारे २७ हजार डॉलर म्हणजेच साधारण १८ लाख रुपये (भारतीय चलनानुसार) इतकी होते. दरम्यान ‘माझी सर्व्हिस पाहून लोक पुन्हा पुन्हा माझ्याकडे बुट पॉलीश करवून घ्यायला येतात’, असं वार्ड सांगतो.

First Published on: August 27, 2018 10:28 AM
Exit mobile version