पंतप्रधानांना जिवंत जाळण्याचा होता कट, लष्करामुळे वाचले प्राण, नौदलाच्या तळावर घेतला आश्रय

पंतप्रधानांना जिवंत जाळण्याचा होता कट, लष्करामुळे वाचले प्राण, नौदलाच्या तळावर घेतला आश्रय

श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नौदलाच्या त्रिंकोमाली येथील तळावर आश्रय घेतला आहे. सोमवारी हजारोच्या संख्येने  राजपक्षे यांच्या निवासस्थानावर हल्ला करत आत पेट्रोल बॉम्ब फेकले होते. तसेच घरासमोर पार्क केलेल्या वाहनांना आग लावली होती. यावेळी हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना गोळीबार करावा लागला होता. मंगळवारी सकाळी अंत्यत कडेकोट बंदोबस्तात महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांना घरातून बाहेर काढण्यात आले.

संपूर्ण श्रीलंकेतच महिंदा आणि त्यांच्या समर्थकांविरोधात जनक्षोम उसळला आहे. यामुळे महिंदा यांना हेलिकॉप्टरमधून देशाच्या पूर्वेकडील त्रिंकोमाली येथे असलेल्या नौदलाच्या तळावर हलवण्यात आले. मात्र याबद्दल कळताच हिंसक आंदोलनकर्ते नौदलाच्या तळावर थडकले असून तेथे मोठ्या प्रमाणावर सैनिक आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महिंदा यांनी राजीनामा दिल्यानंतर हिंसाचाराच्या घटना घडत असून आतापर्यंत या संघर्षात २०० जण जखमी झाले आहेत. यात काही सत्ताधारी खासदारांचाही समावेश आहे.

राष्ट्रपती गोताबाया राजपक्षेंच्या राजीनाम्याची मागणी

महिंदा राजपक्षेच्या राजीनाम्यानंतरही लोकांचा जनक्षोम क्षमला नसून आता राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. महिंदा राजपक्षे व त्यांच्या कुटुबीयांना आज पहाटे हजारो आंदोलनकरत्यांच्या गराड्यातून नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून कसेबसे बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान आंदोलनकर्ते महिंदा यांच्यापर्यंत पोहचू नये यासाठी पोलीस हवेत गोळीबार करत होते तसेच अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडत होते. यादरम्यान हिंसक जमावाने महिंदा यांच्या घरात १० पेट्रोल बॉम्ब फेकले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंकेत पहील्यांदाच एवढी मोठ्या प्रमाणात आर्थिक अराजकता माजली आहे. यासाठी राजपक्षे परिवाराला जबाबदार ठरवण्यात येत आहे. यादरम्यान, संयुक्त राष्ट्र महासचिव अंटोनियो गुटेरेस यांनी श्रीलंकेन जनतेने चर्चेतून आर्थिक संकटाचा प्रश्न सोडवावा असे सुचवले होते. दरम्यान महिंदा राजपक्षे यांनी आपले बंधू राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. यानंतरच राजपक्षे कुटुंबाचे समर्थक आणि विरोधक आमने सामने आले.

 

 

 

First Published on: May 10, 2022 6:05 PM
Exit mobile version