लॉकडाऊनमध्ये पोलिसाचा ‘सिंघम’ स्टाइल व्हिडीओ व्हायरल; कर्तव्य सोडून खतरनाक स्टंट!

लॉकडाऊनमध्ये पोलिसाचा ‘सिंघम’ स्टाइल व्हिडीओ व्हायरल; कर्तव्य सोडून खतरनाक स्टंट!

लॉकडाऊनमध्ये पोलिसाचा 'सिंघम' स्टाइल व्हिडीओ व्हायरल; कर्तव्य सोडून खतरनाक स्टंट!

कोरोना विरोधातील युद्धात पोलीस कर्मचारी, नर्स, डॉक्टर हे सर्व कोरोना योद्धे म्हणून आपले कर्तव्य बजावताना दिसताय तर काही पोलीस कर्मचारी हे देशात लॉकडाऊन जाहीर केल्यापासून लोकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र रस्त्यावर उतरले आहे. यावेळी थेट कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात आल्याने बऱ्याच पोलिसांना कोरोनाची लागण देखील झाल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत एक पोलीस अधिकारी ‘सिंघम’ गिरी करताना दिसत आहे. आपले कर्तव्य सोडून खतरनाक स्टंटबाजी करणाऱ्या या पोलिसाचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

मध्य प्रदेशातील दमोह येथील उप-निरिक्षक मनोज यादव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मनोज यादव दोन गाड्यांवर उभे राहून खाकी वर्दीत सिंघम स्टाईल लूकमध्ये बघायला मिळताय. दरम्यान हा व्हिडीओ सध्याच्या गंभीर परिस्थितीत कितपत खरा आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही आहे. तसेच काहींच्या मते हा व्हिडीओ जुना असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, उप-निरिक्षक यादव यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या तीन महिन्यांपूर्वीच ते इंदूर पोलीस प्रशिक्षणासाठी गेले होते. तेव्हा हा व्हिडीओ तिथेच चित्रीत करण्यात आला होता. त्यावेळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रशिक्षणादरम्यान असं आव्हान मी घेतले होते. परंतु मी हा व्हिडीओ माझ्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला नव्हता. दरम्यान, हा व्हिडीओ अचानक व्हायरल कसा झाला याची कल्पना त्यांना देखील नसल्याचे त्यांनी सांगितले.


Video – लॉकडाऊनमध्ये कुत्राही शिकला लपाछपी खेळायला, व्हिडिओ एकदा बघाच!

 

First Published on: May 11, 2020 9:14 PM
Exit mobile version