Corona: देशात बाधितांचा आकडा १९ लाख पार; २४ तासांत ५२,५०९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

Corona: देशात बाधितांचा आकडा १९ लाख पार; २४ तासांत ५२,५०९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोना व्हायरस या महामाराशी भारतासह जगातील सर्वच देश संघर्ष करत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत देशात ५२ हजार ५०९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत देशात १९ लाख ८ हजार २५५ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची नोंद करण्यात आली आहेत. यापैकी ५ लाख ८६ हजार २४४ रूग्ण सध्या कोरोनाशी लढा देत आहेत तर १२ लाख ८२ हजार २१६ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ३९ हजार ७९५ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या देशात सुमारे सहा लाख कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील रूग्णालयात एक लाखाहून अधिक कोरोना संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू, तिसर्‍या क्रमांकावर कर्नाटक, चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात २ कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हीटीचा दर ११ टक्के होता. अशा परिस्थितीत, एकूण संख्येच्या आधारे भारताचा पॉझिटिव्हीटीचा दर ८.८९ टक्के आहे. अशी २८ राज्ये आहेत जी दररोज १४० मिलियन चाचणी घेत आहेत. देशात सध्या ५ लाख ८६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. लॉकडाऊननंतर मृत्यूदर सध्या सर्वात कमी २.१० टक्के आहे. COVID मुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ६८ टक्के पुरुष आणि ३२ टक्के महिलांचा समावेश आहे.

कोरोना संक्रमणाच्या संख्येनुसार अमेरिका, ब्राझीलनंतर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कोरोना प्रभावित देश आहे. भारतापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिका (४,८६२,१७४), ब्राझील (२,७५१,६६५) मध्ये आहेत. देशातील कोरोना प्रकरणात वाढ होण्याचा वेग जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Corona Live Update: राज्यात २४ तासांत ९ हजार ५०९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

First Published on: August 5, 2020 10:32 AM
Exit mobile version