उत्तर प्रदेशच्या कन्नोजमधील चक्रीवादळात सहा जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या कन्नोजमधील चक्रीवादळात सहा जणांचा मृत्यू

तितली चक्रीवादळ

कोरोनच्या प्रादुर्भावाचे संकट असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसानेही कहर केला आहे. उत्तर प्रदेशमधील कन्नोज जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींचा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वादळ वाऱ्यासह येथे गारांचा पाऊसदेखील पडला आहे. कन्नोज जिल्ह्याच्या तिर्वा परिसराला चक्रीवादळ आणि गारांच्या पावसांचा मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना योगी सरकारकडून प्रत्येकी ४ लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा – वृत्तपत्र जाहिरातींची थकबाकी हवेतच!

उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

चक्रीवादळात २६ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे अनेक झाडं रस्त्यावर पडली असून अनेक विजेचे खांबदेखील पडले आहे. तसेच शेतीचे आणि पोल्ट्री फार्मचेही मोठे नुकसान झाले आहे. विजेचे खांब कोसळल्यामुळे १२ पेक्षा जास्त गावांमधील वीज ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील स्थानिक उपजिल्हाधिकाऱ्यांनी गावांमध्ये जावून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कन्नोज जिल्ह्यात अगोदर अशाप्रकारचे चक्रीवादळ कधीही पाहिली नव्हती, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी दिली. जिल्ह्यातील ठठिया क्षेत्रात एका व्यक्तीच्या डोक्यावर गारा पडल्याने त्याचा मृत्यू झाला असून दुसरीकडे भिंत पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एका व्यक्तीच्या अंगावर झाडाची फांदी पडल्याने मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरची ट्रॉली चक्रीवादळात पलटल्याने ८ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

First Published on: May 31, 2020 9:19 AM
Exit mobile version