नोएडामध्ये २ इमारती कोसळल्या; तिघांचा मृत्यू

नोएडामध्ये २ इमारती कोसळल्या; तिघांचा मृत्यू

नोएडातील इमारत दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू

नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या चार मजली आणि सहा मजली अशा दोन इमारती कोसळल्या आहेत. मध्यरात्री झालेल्या या दुर्घटनेमध्ये ३ जण ठार झाले असून जवळपास ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफच्या ४ तुकड्या सध्या घटनास्थळी काम दाखल झाल्या असून रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे. मध्यरात्री इमारती कोसळल्यानंतर आत्तापर्यंत २ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. तर, ५ जेसीबींच्या साहाय्याने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. इमारत बांधताना सर्व प्रकारच्या नियमांचे पालन झाले होते का नाही? याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

First Published on: July 18, 2018 8:13 AM
Exit mobile version