या ट्रेनमधून स्लीपर कोच हटणार; फक्त एसी डबा धावणार

या ट्रेनमधून स्लीपर कोच हटणार; फक्त एसी डबा धावणार

प्रातिनिधिक छायाचित्र

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता जलदगतीने आपल्या निश्चित ठिकाणांवर पोहोचण्यासाठी तुमच्या रेल्वेची गती धीमी होणार नाही. यापुढे ताशी १३० ते १६० किमी वेगाने धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधून स्लीपर म्हणजेच नॉन एसी डबा हटवण्याचा विचार रेल्वे मंत्रालयाने केला आहे. या रेल्वेंना यापुढे फक्त एसी डबा असले. याबाबत स्पष्टीकरण देताना रेल्वेने सांगितले की, १३० प्रतिताशी वेगाने धावणाऱ्या रेल्वेला नॉन एसी डब्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा रेल्वेंमधून स्लीपर कोच हटविण्याचा विचार केला जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने पुढे सांगितले की, याचा अर्थ असा नाही, की सर्वच स्लीपर कोच डबे काढून टाकण्यात येणार. नॉन एसी डबे असणाऱ्या रेल्वेचा वेग कमी असणार आहे. स्लीपर कोच असलेल्या रेल्वे या ताशी ११० किमी वेगाने धावल्या जाणार आहेत. रेल्वेतील हे नवीन बदल टप्प्याटप्प्याने पुर्ण केले जाणार आहेत. तसेच या प्रयोगानंतर जे अनुभव येतील, त्यावर भविष्यात आणखी नवीन योजना आणली जाईल.

रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते डी. जे. नारायण यांनी सांगितले की, या प्रयोगामुळे रेल्वेचे तिकीट दर कमी होऊ शकतील. मात्र या प्रयोगाला चुकीच्या अर्थाने घेतले जाऊ नये. विद्यमान परिस्थितीत अनेक मार्गांवरील एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचा वेग हा ताशी ११० किमी एवढाच आहे. तर राजधानी, शताब्दी आणि दुरांतो सारख्या प्रीमियम रेल्वेगाड्यांचा वेगल ताशी १२० किमी एवढा आहे. नारायण पुढे म्हणाले की, नव्या एसी रेल्वेगाड्यांचे तिकीट दर प्रवाशांना परवडणारे असतील. तसेच रेल्वेत अधिक सुविधा आणि आरामदायक प्रवासासोबतच एकूण प्रवासाचा वेळही वाचेल. त्यांनी सांगितले की, कपूरथळा येथे नवीन एसी कोचच्या प्रोटोटाइपचे काम सुरु आहे. पुढच्या काही आठवड्यात याचे काम पुर्ण व्हायला हवे.

सध्या ८३ बर्थ असलेल्या कोचचे डिझाईन तयार आहे. या वर्षअखेरपर्यंत याप्रकारचे १०० डबे बनविण्याची योजना प्रस्तावित आहे. पुढच्या वर्षी २०० डबे निर्माण करण्याचे टार्गेट आहे. हे डबे रुळावर आल्यानंतर त्यांचे मुल्यांकन केले जाईल आणि त्या आधारावर पुढे असे डबे निर्माण करायचे की नाही? याचा निर्णय घेतला जाईल.

First Published on: October 11, 2020 8:25 PM
Exit mobile version