Smart phone स्टोरेज फूल्ल; लागलीच करा ‘हे’ काम, फायद्यात राहाल

Smart phone स्टोरेज फूल्ल; लागलीच करा ‘हे’ काम, फायद्यात राहाल

नवी दिल्ली : स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ऑनलाईन सर्चिंग किंवा इतर अनेक गोष्टींसाठी आपण स्मार्टफोनचा वापर करतो. यामुळे कॅशे फाईल जमा होतात आणि आपल्याला स्टोरेज फुलच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा वेळेला आपल्याला स्मार्टफोनवर काहीच करता येत नाही. त्यामुळे स्मार्टफोन बिनकामाचा होता. या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी आम्ही काही मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील बरीच जागा मोकळी करू शकता. (Smart phone storage full then use this trick it will be beneficial)

सध्याच्या काळात स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. दिवसातील कित्येक तास आपण स्मार्टफोनचा वापर करतो. प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी आपण स्मार्टफोनचा वापर करतो. त्यामुळे स्टोरेज फुल ही सामान्य गोष्ट झाली आहे. पण यापासून सुटका मिळविण्यासाठी जेव्हा आपण स्मार्टफोनवर एखादी वेबसाइट किंवा ऍप उघडतो तेव्हा त्या वेबसाइट किंवा ऍपशी संबंधित सर्व डेटा आपल्या स्मार्टफोनमध्ये संग्रहित व्हायला सुरूवात होते. मग हळूहळू कॅशे फाइल्सच्या माध्यमातून हा डेटा इतका वाढतो की आपल्या स्मार्टफोनमधील स्टोरेजचा मोठा भाग व्यापून घेतो. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनमधील जागा मोकळी करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन कॅशे फाइल्स डीलीट माराव्या लागतील. जेणेकरून स्मार्टफोनमधील जागा मोकळी होईल.

गॅलरी फोटो कसे डिलीट मारावे?
आपण स्मार्टफोनमध्ये काढलेले फोटो किंवा व्हिडिओ डिव्हाइसमधील बरीच जागा व्यापून घेतात. अशा परिस्थितीत गॅलरीमधील आपल्या बिनकामाचे फोटो, व्हिडिओ डिलीट मारून किंवा इतर ठिकाणी हटवून स्टोरेज वाढवू शकतात. यासाठी आपल्याला गॅलरीमधील फोटो किंवा व्हिडिओचा बॅकअप घ्यावा लागेल.

डाउनलोड फाइल्स गरज नसल्याच लगेच डिलीट करणे गरजेचे?
अनेक वेळा आपण आपल्या कामाच्या फाइल्स इंटरनेटवरून डाउनलोड करतो. त्या फाइल्स त्या वेळेपुरताच आवश्यक असतात. त्यानंतर त्या फाइल्सचा आपल्या काहीच कामाच्या नसतात. परंतु त्या वेळेवर डिलीट न मारल्यामुळे त्या स्टोरेजचा भाग बनत जातात. यासाठी डाउललोड फाइल्स गरज नसल्यास वेळोवेळी डिलीट करणे गरजेचे असते.

चित्रपट आणि ऑफलाइन व्हिडिओ फाइल्स डिलीट केल्यानेही स्टोरेजमध्ये होते जागा
बहुतेक स्मार्टफोन वापरकर्ते आपल्या फोनवर चित्रपट पाहणे आवडते. अशा परिस्थितीत वापरकर्ते चित्रपट आणि व्हिडिओ पाहण्यासाठी नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राइम आणि इतर ओटीटी ऍप्सच्या माध्यमातून व्हिडिओ फाइल्स डाउनलोड करतात. यामुळे स्टोरेज फुल होते. त्यामुळे स्टोरेज रिकामे करण्यासाठी या व्हिडिओ फाइल्स डिलीट केल्यास जागा मोकळी होऊ शकते.

First Published on: May 26, 2023 8:56 AM
Exit mobile version