काळी जादू करणाऱ्या आईची मुलाने केली हत्या

काळी जादू करणाऱ्या आईची मुलाने केली हत्या

प्रातिनिधिक फोटो

काळी जादू करत असल्याच्या संक्षयावरून एका ३० वर्षीय मुलाने आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेलंगनाच्या राजना सरकिला जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २३ डिसेंबर रोजी घडली. मागील अनेक महिन्यांपासून मुलगा आणि आईमध्ये वाद होत होते. श्रीनिवास असे या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी ३०२ कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

आपल्यावर काळी जादू करण्याचा संक्षय

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी हा माथे फिरू असून मागील काही दिवसांपासून त्याचा आईशी वाद होत होता. आपलीच आई काळी जादू करते असे त्याला वाटत होते. त्याने अनेकदा आईला पुजा करण्यापासून थांबवले. मात्र तरीही आई पुजा करत असल्याने त्याने अखेर आईचा खून केला. दरम्यान या आरोपीची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

First Published on: December 25, 2018 4:40 PM
Exit mobile version