सोनिया गांधींनी केली चिदंबरम यांच्या प्रकृतीची विचारपूस

सोनिया गांधींनी केली चिदंबरम यांच्या प्रकृतीची विचारपूस

पी. चिदंबरम, माजी अर्थमंत्री

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तिहारा तुरुंगात जाऊन भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. मात्र, त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

चिदंबरमच्या पुत्रांनी ही घेतली भेट

आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चिदंबरम गेल्या ५ सप्टेंबरपासून तिहारा तुरुंगात आहेत. त्यांची आज मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी भेट घेऊन चर्चा केली आहे. काँग्रेस पक्ष चिदंबरम यांच्या सोबत आहे, असा संदेश या भेटीतून देण्याचा सोनिया गांधींचा उद्देश आहे. चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ति चिदंबरम हेही त्यांच्यासोबत आले होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चिदंबरम यांच्यासारख्या नेत्यांना अटक झाली आहे. त्यामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. मात्र, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध राज्यांत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत पुन्हा एकदा पक्षाला लढण्याच्या स्थितीत आणण्याचा सोनिया गांधींचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, चिदंबरम यांची भेट हा याचाच एक भाग असल्याचे सूत्रांकडून बोले जात आहे.


हेही वाचा – लोक मला विचारताहेत तुम्हालाच अटक का? चिदंबरम यांची ट्विटरवरुन माहिती


 

First Published on: September 23, 2019 9:50 AM
Exit mobile version