श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात करोडपतीच्या मुलांचा सहभाग

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात करोडपतीच्या मुलांचा सहभाग

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट

ईस्टर संडेच्या दिवशी आठ साखळी बॉम्बस्फोटाने हादरलेल्या श्रीलंकेमध्ये सोमवारी पुन्हा एकादा आणखी एक स्फोट झाला. या साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी इसीस या दहशतवादी संघटनेने घेतल्याची माहिती मिळाली  समोर आली असताना, या बॉम्बस्फोटाच्या तपासातून असे उघड झाले की, या बॉम्बस्फोट हल्ल्यात देशाच्या कोट्याधीश मसाला व्यापारी असणाऱ्या मोहम्मद यूसुफ इब्राहिमच्या दोन मुलांचा समावेश असून यामागे त्या दोघांचा हाथ होता. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत ३५६ मृत्यू पावलेल्यांची संख्या असून यात शेकडो लोक जखमी झाले आहे.

तौहीद जमातीचे सदस्य

या कोट्याधीश व्यापाऱ्याच्या दोन्ही मुलांनी इलहाम इब्राहिम आणि इंसाफने कोलंबोमधील शांगरीला आणि सिनामॉन ग्रॅंड हॉटेलमध्ये नाश्त्याच्या रांगेत उभे असताना संगळ्यांसमोर आत्मघाती हल्ला घडवून आणला होता. समोर आलेल्या अहवालानुसार, त्यांचा कौटुंबिक व्यवसाय ते सांभाळत होते. त्यांचे वय २५ ते ३० वयवर्षादरम्यान होते. हे दोघे ही इस्लामिल संघटन नॅशनल तौहीद या जमातीचे सदस्य होते आणि श्रीलंकेतील हल्ल्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांकडून तपासणी

आत्तापर्यंत ५८ संशयितांना अटक करण्यात आले आहे.  या दोघांनी स्वतःला उडवल्यानंतर पोलिसांकडून तपास केला जात आहे. या तपासणीत असे आढळून आले की, एका भावाने चुकीची माहिती दिली तर दुसऱ्या भावाने बरोबर माहिती दिली. या तपासणीवरून पोलीस कोलंबोच्या राहत्या घरी पोहचले.

कुटुंबाचा बॉम्बस्फोटात मोठा हाथ

ज्यावेळी पोलिसांनी त्यांच्या घरी छापा घातल्यावर इलहाम इब्राहिमची पत्नी फातिमा तेथे उपस्थित होती. पोलिसांनी केलेल्या तपासणीत माहिती मिळाल्यानंतर तिने स्वतःला उडवले. यामध्ये तिच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला. यासोबत तपासणीसाठी गेलेल्या तीन पोलिसांचा ही मृत्यू झाला. याच कुटुंबाचा या बॉम्बस्फोटात मोठा हाथ असल्याचे मानले जात आहे.  याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैकी अधिक लोकांचा समावेश या परिवारातील आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

First Published on: April 25, 2019 10:54 AM
Exit mobile version