आता ‘कार्बन डायऑक्साईड’पासून बनणार इंधन

आता ‘कार्बन डायऑक्साईड’पासून बनणार इंधन

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मद्रास)

‘आयआयटी मद्रास’च्या शास्त्रज्ञांनी प्राथमिक तत्वावर ‘स्पेस फ्युएल’ (अंतराळातील इंधन) तयार केलं आहे. कार्बन डायऑक्साईडचा वापर करुन हे ‘स्पेस इंधन’ तयार करण्यात आलं आहे. लवकरच या इंधनाची मोठ्याप्रमाणावर निर्मिती करण्यात येणार असल्याचं संशोधकांकडून सांगण्यात येत आहे. या इंधनाचा वापर खास अंतराळयानासाठी केला जाणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. एखादं अंतराळयान पृथ्वीवरुन अंतराळाकडे झेपावण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप जास्त प्रमाणात इंधन खर्च होते. तसंच त्या यानाला अंतराळात फिरत राहण्यासाठी देखील प्रचंड प्रमाणात इंधनाची गरज असते. त्यामुळे सहाजिकच एखादं यान अंतराळात जाण्यापासून ते परत येईपर्यंत लागणारं अफाट प्रमाणातील इंधन, हे पृथ्वीवरील मर्यादित इंधन साठ्यातूनच खर्च होते. यावरच उपाय म्हणून ‘आयआयटी मद्रास’च्या संशोधकांनी कार्बन डायऑक्साईडपासून या विशेष ‘स्पेस फ्युएल’ची निर्मीती केल्याचं समजतंय. ‘नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्स’ (PNAS) यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हे स्पेस इंधन पृथ्वीवरील इंधन साठ्याची बचत करणार असून, त्याची निर्मिती खास पर्यवरण संवर्धक पद्धतीने केली जाणा आहे. ज्यामुळे पर्यावरणालाही ते हानिकारक ठरणार नाही.

मद्रासच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (IIT) शास्त्रज्ञ थल्लपील प्रदीप यांच्या म्हणण्यानुसार, आमच्या शोधानुसार कार्बन डायऑक्साईड, हाइड्रेट, मिथेन आणि अमोनिया सारखे घटक अंतराळात राहू शकतात. तसंच हे घटक पाण्यामध्ये सहजरित्या मिसळतात. यासोबतच मिथेन, हाइड्रेट, अमोमिया आणि सीओटू सारख्या घटकांपासून गॅसची निर्मीती देखील केली जाऊ शकते. शिवाय कुणल्याही वातावरणात आणि तापमानातही हे घटक तग धरू शकतात. त्यामुळे या घटकांच्या साहाय्याने अंतराळ यानासाठी लागणारं इंधन तयार करण्याची कल्पना आम्हाला सुचली आणि या इंधनाच्या निर्मितीला सुरुवात झाली. प्रत्यक्षात हे ‘स्पेस इंधन’ कितपत पर्यावरण पूरक ठरणार? याचा खरोखरंच वापर होणार का हे येणारा काळच सांगेल.


वाचा: दुसऱ्या चित्रपटात ‘मोदी’ मीच – परेश रावल

 

 

First Published on: January 10, 2019 11:13 AM
Exit mobile version