Corona: देशात २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!

Corona: देशात २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!

कोरोना व्हायरस

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत आतापर्यंत सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत २९ हजार ४२९ कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळले असून ५८२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ३६ हजार १८१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २४ हजार ३०९ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ९२ हजार ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर देशात सध्या ३ लाख १९ हजार ८४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील रिकव्हरी रेट हा ९६.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोना रुग्ण दुप्पाटी रेट ६३.२० टक्के इतका आहे. तर मृत्यूदर ३.९५ टक्के इतका आहे, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे.

१४ जुलैपर्यंत देशात १ कोटी २४ लाख १२ हजार ६६४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल ३ लाख २० हजार १६१ नमुन्यांच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.


हेही वाचा – Corona: देशात २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!


 

First Published on: July 15, 2020 9:37 AM
Exit mobile version