SSC GD पदांसाठी मेगा भरती, जाणून घ्या डिटेल्स आणि असा करा अर्ज

SSC GD पदांसाठी मेगा भरती, जाणून घ्या डिटेल्स आणि असा करा अर्ज

कर्मचारी निवड आयोगातर्फे कॉन्स्टेबल पदासाठी (SSC – Staff Selection Commission)  मेगा भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण २५ हजार २७१ रिक्त जागा वेळी भरण्यात येणार असून त्यात २२ हजार २४२ पदे ही पुरुष कॉन्स्टेबलसाठी आणि २ हजार ८४७ पदे ही महिला कॉन्स्टेबल पदांसाठी आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत इच्छुक उमेदरवार sss.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरु शकतात. १७ जुलै पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर २ सप्टेंबरपर्यंत उमेदवरांना ऑनलाईन फी भरता येणार आहे. या मेगा भरतीची संपूर्ण माहिती जाणून घ्या. (SSC GD Recuitment 2021)

या पदांसाठी भरती

BSF – ७५४५
CISF – ८४५४
SSB – ३८०६
ITBP – १४३१
AR- ३७८५
SSF- २४०

या पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय १८ ते २३ वर्ष असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्याचे शिक्षण दहावी पर्यंत असणे गरजेचे आहे. या भरतीमध्ये निवडल्या गेलेल्या उमेदवारांना २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये इतका पगार देण्यात येणार आहे.

उमेदवारांची शारीरिक क्षमता या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक क्षमता देखील लक्षात घेतली जाणार आहे. पुरुष उमेदवाराची उंची १७० सेमी असणे गरजेचे आहे. तर महिला उमेदवाराची उंची १५७ सेमी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पुरुष उमेदवाराची छाती ८० सेमी फुगवून ८५ सेमी असणे गरजेचे असणार आहे.

असा करा अर्ज


हेही वाचा – Corona Vaccination: महिलेचा चाकू घेऊन लसीकरण केंद्रावर हंगामा

First Published on: August 19, 2021 6:35 PM
Exit mobile version