Paytm: २ लाख रुपयांच्या सेव्हिंगने व्यवसाय सुरू केला, Paytm चे CEO विजय शर्मांची कहाणी

Paytm: २ लाख रुपयांच्या सेव्हिंगने व्यवसाय सुरू केला, Paytm चे CEO विजय शर्मांची कहाणी

Paytm: २ लाख रुपयांच्या सेव्हिंगने व्यवसाय सुरू केला, Paytm चे CEO विजय शर्मांची कहाणी

आज देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ (Initial Public Offering) खुला झाला आहे. म्हणजेच पेटीएम (Paytm) चालवणारी फिनटेक स्टार्टअप कंपनी One97 Communication Ltdचा आयपीओ आज गुंतवणुसाठी खुला झाला. यातून कंपनी जवळपास १८,३०० कोटी रुपये उभारण्याची आशा आहे. पेटीएमने सर्वात मोठा आयपीओमध्ये गुंतवणूक सुरू केल्यामुळे कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा (Paytm CEO Vijay Shekhar Sharma) आज भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्रोत झाले आहेत. याच निमित्ताने आज आपण विजय शेखर शर्मा यांच्याबाबत जाणून घेणार आहोत.

उत्तर प्रदेशमधील अलीगढ जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील मूळचे रहिवाशी असलेले आणि एका शिक्षकाचा मुलगा म्हणजेच विजय शर्मा यांचे नाव आज फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट आहे. दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून विजय शर्मा यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेतली होती. १९९७ मध्ये कॉलेज शिक्षणादरम्यान विजय शर्मा यांनी एक वेबसाईट indiasite.net सुरू केली आणि दोन वर्षात ती लाखो रुपयांना विकली गेली. त्यानंतर २००० मध्ये विजय शर्मा यांनी One97 Communication Ltdची सुरू केली. याद्वारे बातम्या, क्रिकेट स्कोअर, रिंगटोन, जोक्स आणि परीक्षांचे निकाल यासारखे मोबाईलवर कंटेन्ट दिले गेले. ही पेटीएमची मूळ कंपनी आहे.

या कंपनीची सुरुवात दक्षिण दिल्लीतील एका भाड्याच्या खोलीतून सुरू केली होती. २०१०मध्ये पेटीएम सुरू झाले. एका मुलाखतीमध्ये विजय शर्मा म्हणाले होते की, ‘माझ्या व्यवसायात सर्वात मोठी शिकवण हीच होती की, त्यात रोख प्रवाह येणार नव्हता. मी बचत केलेल्या पैशातून लगेचच पैसे संपले आणि त्यानंतर मला मित्रांकडून आणि कुटुंबातील सदस्यांकडून कर्ज घ्यावे लागले. काही दिवसात तेही पैसे संपले. त्यानंतर शेवटी मला एका ठिकाणाहून ८ लाख रुपयांचे कर्ज २४ टक्क्यांच्या व्याजाने मिळाले.’

पुढे विजय शर्मा म्हणाले की, ‘मग मला एक व्यक्ती भेटला. तो म्हणाला की, जर माझ्या तोट्यात असलेल्या टेक्नोलॉजी कंपनीला नफा मिळवून दिला तर मी तुमच्या कंपनीत गुंतवणूक करू शकतो. मी त्यांच्या व्यवसायात नफा मिळवून दिला आणि त्यांनी माझी कंपनी One97 Communications Ltd चे ४० टक्के इक्विटी खरेदी केली. २०११मध्ये अनेक प्रकारच्या आयडिया आल्या. परंतु शेवटी आम्ही स्मार्टफोनतून पेमेंटची व्यवस्था निवडली. तेव्हा भारतात टेलीकॉम बूम लोकप्रिय होता. अशा प्रकारे मोबाईलमधून पेमेंटवाल्या पेटीएमचा जन्म झाला. पेटीएम हे पे थ्रू मोबाईलचे (pay through mobile) शॉर्ट रुप आहे.’

दरम्यान २०१६ साली नोटबंदीपासून पेटीएम अधिक लोकप्रिय झाले. नोटबंदीपासून पेटीएमचा एक अरब होणारा व्यवहार दोन महिन्यात ३ अरब झाला. पेटीएमने भारतीय क्रिकेट संघाची स्पोंसरशिप घेतली. यामुळे पेटीएम ब्रँड आणखीन मजबूत झाला. त्यानंतर गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या कोरोना संकटाने पेटीएमला १ अरब डॉलरची कंपनी बनवले. २०१८ साली ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या दिग्गज गुंतवणूदार वारेन बफेट (Warren Buffett) यांची कंपनी बर्कशायर हॅथवेने ३० कोटी अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली. विजय शेखर शर्मा आज फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत सामील आहेत.

First Published on: November 8, 2021 5:40 PM
Exit mobile version