तीने गोंडस मुलीला जन्म दिला पण कोरोनाला हे सुख बघवलं नाही!

तीने गोंडस मुलीला जन्म दिला पण कोरोनाला हे सुख बघवलं नाही!

'लॉकडाऊन'दरम्यान बाळाचा जन्म; नाव ठेवलं 'लॉकडाऊन'!

उत्तर प्रदेशमधील आगराच्या महिला काँस्टेबलने एका गोंडस मुलीला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर पुढील तीन दिवसातच त्या महिला काँस्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला. २७ वर्षाच्या या महिला काँस्टेबलचा बुधवारी मृत्यू झाला. ती कानपुर जिल्ह्याच्या बिल्हौर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होती. ही माहिला बाळंतपणासाठी एक एप्रिलला आगराच्या इश्वर नगर येथे आपल्या सासरी आली होती.

महिला काँस्टेबलने २ मे ला आगऱ्याच्या लेडी लयाल हॉस्पिटलमध्ये एका मुलीला जन्म दिला आणि ती ला ४ मे ला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी सकाळी तीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अचानक सर्दी आणि ताप आला आणि दुपारी तीचा मृत्यू झाला.

त्या महिलेच्या सासू आणि पतीला तीच्या मृत्यूनंतर क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आणि त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचबरोबर ती महिला ज्या भागात रहात होती तीथे सॅनिटायझरही करण्यात आलं आहे.

एसएचओ अरविंद कुमार यांनी सांगितले की, महिलेच्या पतीने आम्हाला याची माहिती दिली होती. आरोग्य विभाग त्यानुसार काम करत आहे. या आधी २ मे ला मृत महिलेचे सासरे रणधीर सिंह यांचा दिल्लीत लीवर खराब झाल्यामुळे मृत्यू झाला होता. मात्र त्यांना कोरोनाची लागण झालेली नव्हती.

या आधी ५७ वर्षाच्या कॉन्स्टेबल यांची एसएन मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू झाला होता. त्यांनाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. मृत कॉन्स्टेबलला सरकारकडून ५० लाख रूपये देण्यात आले. कारण त्याला ड्यूटीवर असताना कोरोनाची लागण झाली होती.


हे ही वाचा – कोरोना काही जाईना चला, त्याच्याबरोबरच जगायची आता तयारी करूयात!


 

First Published on: May 7, 2020 11:00 PM
Exit mobile version