एअर इंडियाच्या मालकीचे धोरणात्मक हस्तांतरण पूर्ण; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा

एअर इंडियाच्या मालकीचे धोरणात्मक हस्तांतरण पूर्ण; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर केला. यावेळी मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, नवीन PSU धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एअर इंडियाच्या मालकीचे धोरणात्मक हस्तांतरण पूर्ण झाले आहे, यासाठी धोरणात्मक भागीदार निलाचल इस्पात निगम लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी मालकीची एअर इंडिया कंपनी आता टाटा समूहाच्या मालकीची झाली आहे. याशिवाय एलआयसीचा पब्लिक इश्य लवकरचं होणे अपेक्षित आहे. तर इतरांसाठी प्रक्रिया देखील 2022-23 मध्ये सुरू होऊ शकते.असं केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या.

सीतारामन पुढे म्हणाल्या की, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स अँड डेव्हलपमेंट बँक (एनएबीफीड) आणि नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांचे काम सुरू केले आहे.

कॉर्पोरेट निर्गमनाचा वेग वाढवणार

सीतारामन म्हणाल्या की, नवीन कंपन्यांच्या नोंदणीला गती देण्यासाठी अनेक आयटी आधारित प्रणाली स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र या कंपन्यांना स्वेच्छेने बंद करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी री-इंजिनियरिंग प्रक्रियेसह सेंटर फॉर प्रोसेसिंग एक्सेलरेटेड कॉर्पोरेट एक्झिट (C-PACE) केंद्राची स्थापना केली जाईल. याद्वारे कंपन्याना बंद करण्यासाठी लागणारा कालावधी दोन वर्षांवरून सहा महिन्यांवर आणला जाईल.

अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की, रिझोल्यूशन प्रक्रियेच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी आणि क्रॉस-बॉर्डर दिवाळखोरीचे निराकरण सुलभ करण्यासाठी संहितेत आवश्यक सुधारणा केल्या जातील.


 

First Published on: February 1, 2022 2:25 PM
Exit mobile version