बारावीत ८० टक्के मिळून देखील विद्यार्थ्यानी ‘या’मुळे केली आत्महत्या

बारावीत ८० टक्के मिळून देखील विद्यार्थ्यानी ‘या’मुळे केली आत्महत्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ अर्थात महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या निकालात एका विद्यार्थ्याला ८० टक्के मिळून देखील त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यात घडली आहे. या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

बारावीत ८० टक्के मिळाले खरे पण, इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याने मानसिक तणावातून या विद्यार्थ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कव्हळा येथील विनायक लांडे या विद्यार्थ्याला बारावीत इंग्रजी विषयात ५६ गुण मिळाले. मात्र, विनायकच्या बहिणीला त्याच्यापेक्षा जास्त मार्क म्हणजे ८४ टक्के मिळाले. त्यामुळे विनायक तणावाखाली गेला. विनायक आज सकाळी झोपेतून उठून कोणालाही न सांगता घरुन शेतात गेला. त्याठिकाणी त्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – धक्कादायक! लातूरमध्ये एकाच दिवशी आढळले सर्वाधिक रुग्ण; मृतांचा आकडा ४८ वर


 

First Published on: July 17, 2020 10:08 PM
Exit mobile version