मंदी नसल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुब्रमण्यम स्वामींचे खोचक उत्तर

मंदी नसल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुब्रमण्यम स्वामींचे खोचक उत्तर

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी

भारताची अर्थव्यवस्था ही बहुतेक देशांपेक्षा चांगली आहे. एवढेच नाही तर जगात अत्यंत वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळेच भारतात आर्थिक मंदी येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे उत्तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिले. यानंतर काँग्रेसने सभा त्याग केला. यावर भाजप खासदार सुब्रहमण्यम स्वामी ट्विट करून भाजपला खोचक उत्तर दिले.

सुब्रहमण्यम स्वामीच्या ट्वीटमध्ये काय –

भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीची स्थिती निर्माण होण्याची शक्यताच नाही, असे अर्थमंत्र्यांनी सांगितल्याच् मला प्रसारमाध्यमांमधून कळाले. त्या बरोबर बोलत आहेत, कारण भारतीय अर्थव्यवस्था आधीच गेल्या वर्षी मंदीत गेली आहे. त्यामुळे मंदीच्या स्थितीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा टोला सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन –

इंघनदरवाढ, इंधनावरील उपकर, खाद्यान्नाची महागाई अशा विविध मुद्यांवर विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकारला सोमवारी धारेवर धरले. मात्र, महागाईवरील चर्चा वस्तुस्थितीवर आधारित नाही, तर केवळ राजकीय होती. विरोधकांचे आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे सीतारामन म्हणाल्या. अमेरिकेसारख्या विकसित देशांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत जात असल्या तरी, भारतामध्ये मदंची स्थिनी निर्माण होणार नाही. महागाईमुळे आर्थिक विकासाची गतीही कमी होणार नाही. उलट महागाई नियंत्रणात ठेवली जाईल, असा दावा त्यांनी केला.

First Published on: August 2, 2022 10:44 AM
Exit mobile version