आशिया चषकात भारताचा दारुण पराभव का झाला? सुब्रमण्यम स्वामींच्या ट्वीटने तर्कवितर्कांना ऊत

आशिया चषकात भारताचा दारुण पराभव का झाला? सुब्रमण्यम स्वामींच्या ट्वीटने तर्कवितर्कांना ऊत

नवी दिल्ली – भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी आशिया चषकात भारताच्या पराभवाची खिल्ली उडवली असून थेट सट्टेबाजीचा ठपका ठेवला आहे. याशिवाय त्यांनी आशिया चषकाचे आयोजक कोण असा प्रश्न विचारला आहे.

ट्विटमध्ये काय – 

आशिया चषकात भारताचा दारुण पराभव का झाला? आणि आपण इतके वाईट का हरलो? बेटिंग? मी निरागसपणे विचारतो., इसे ट्विट माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

सुब्रमण्यम स्वामींच्या या ट्विटनंतर सर्वत्र तर्कवितर्कांना ऊत आला आहे. लोक आपापल्या परीने त्याचा अर्थ लावत आहेत. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी अनेकदा मोदी सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. स्वामी ज्या गोष्टींवर बोट ठेवतात, त्यामध्ये काही तरी दडलेले् असते, असे म्हटले जाते. त्यामुळे आता स्वामी यांनी आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या पराभवावर बोट ठेवले आहे, त्याचबरोबर सट्टेबाजीबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. स्वामी यांच्या ट्विटमुळे आशिया चषकात भारताला पराभूत करण्यासाठी खरंच सट्टेबाजी झाली होती का, अशी चर्चा सध्या क्रिकेट विश्वात सुरु आहे. त्यामुळे आता या गोष्टीची चौकशी होणार का?  याकडे तमाम भारतीय चाहत्यांचे लक्ष लागलेले  आहे.

First Published on: September 11, 2022 8:16 PM
Exit mobile version