Cyclone Amphan: अम्फान चक्रिवादळाने पकडला वेग; बंगाल-ओडिशामध्ये पाऊस

Cyclone Amphan: अम्फान चक्रिवादळाने पकडला वेग; बंगाल-ओडिशामध्ये पाऊस

Cyclone Amphan

बंगालच्या उपसागरात वाढलेला चक्रीवादळ अम्फान आता सुपर चक्रीवादळामध्ये (Super Cyclone) बदललं आहे. जे आता वेगाने पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की, सुपर चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात नुकसान करु शकतं. पश्चिम बंगालच्या दिघामध्ये मंगळवारी संध्याकाळपासूनच जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्याचबरोबर पाऊसदेखील सुरू झाला आहे. बुधवारी या भागात अ‍ॅम्फॉनचे वादळ येण्याची शक्यता आहे.

दोन आव्हानांना तोंड देतोय – एनडीआरएफ डीजी

एनडीआरएफचे प्रमुख एस.एन. प्रधान यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं की चक्रीवादळावर लक्ष ठेवण्यात येत आहे. एनडीआरएफच्या १५ टीम ओडिशामध्ये मदतकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तर १९ टीम पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत, तर २ संघ स्टँडबाईवर ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय एनडीआरएफने ६ बटालियन राखीव ठेवल्या आहेत. प्रत्येक बटालियनमध्ये ४-४ टीम आहेत, म्हणजे एकूण २४ टीम तयार आहेत. प्रधान म्हणाले की आम्ही अशा परिस्थितीत आहोत की आपण कोरोना व्हायरस आणि चक्रीवादळाच्या दुहेरी आव्हानांचा सामना करीत आहोत.


हेही वाचा – बेरोजगारीचा दर २४ टक्के; पुढील काळ कामगारांसाठी कठीण – CMIE


सुपर चक्रीवादळ वेगाने वाढत आहे

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार हे चक्रीवादळ उत्तर आणि वायव्य दिशेने ताशी १७ किमी वेगाने वाढत आहे. त्याचा वेग आणखी वाढेल असा अंदाज आहे. चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील दिघा आणि २० मेच्या संध्याकाळपर्यंत बांगलादेशातील हादियावर आदळेल.


हेही वाचा – कृषी भवनातील पासवान यांचं कार्यालय आणि अन्न मंत्रालय सील; एका अधिकाऱ्याला कोरोना


पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती

भारतीय हवामान खात्याचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्तिशाली चक्रीवादळ अम्फानमुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. ते म्हणाले, १९९९ मधील वादळानंतर ओडिशातील अम्फान हे दुसरे सुपर चक्रीवादळ आहे.

ते म्हणाले की ७०० किलोमीटरपर्यंत पसरलेलं आणि सुमारे १५ किलोमीटर उंची असलेलं चक्रीवादळ अम्फान आपल्या केंद्रात ताशी २२० ते २३० किलोमीटर वेगवान आहे. उत्तरेकडे वेगाने सरकताना हे ओडिशाच्या पारादीपच्या दक्षिणेस ६०० कि.मी., पश्चिम बंगालमधील दिघाच्या दक्षिण-नैऋत्येस ७५० कि.मी. आणि बांगलादेशातील खेपुरापासून दक्षिण-दक्षिण-पश्चिमेत १००० किमी पर्यंत आहे.

पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये ऑरेंज अलर्ट जारी

सुपर चक्रीवादळ २० मे रोजी सुंदरबनजवळील दिघा बेट आणि बांगलादेशातील हटिया बेट यांच्यामध्ये धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पश्चिम बंगाल किनारपट्टी आणि ओडिशासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून तेथे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण आणि उत्तर परगणा, पश्चिम आणि पूर्व मेदिनीपूर, हुगळी, हावडा आणि कोलकाता सारख्या पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये १९ मेपासून पाऊस सुरू होईल. हवामान खात्याच्या डीजीने सांगितलं की, पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर, दक्षिण आणि उत्तर २४ परगणा, हावडा, हूगल आणि कोलकाता भागात वादळाचा जास्त परिणाम होईल. त्याचबरोबर ओडिशामधील जगतसिंगपूर, केंद्रापाडा, भद्रक आणि बालासोर जिल्ह्यात चक्रीवादळाचा धोका अधिक आहे. दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागात रेल्वे आणि रस्ते वाहतूक २० मेपर्यंत थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारने चक्रीवादळाच्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पावले उचलण्यास सुरवात केली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा सरकार किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत.

 

 

First Published on: May 20, 2020 12:12 AM
Exit mobile version