दुर्मिळ! ८ तारखेला अवकाशात दिसणार सुपरमून

दुर्मिळ! ८ तारखेला अवकाशात दिसणार सुपरमून

सुपरमून (सौजन्य-नासा)

येत्या बुधवारी म्हणजेच ८ एप्रिल रोजी सुपरमून दिसणार आहे. लोकांसाठी हा दुर्मिळ क्षण असणार आहे. भारतामध्ये हा सुपरमून ८.०५ मिनिटांनी दिसणार असून भारतीयांना ही थेट अवकाशाकडे बघून पाहायला मिळणार नाही. कारण ते दिवसाच्या ८ वाजता सुपरमून असणार आहे. परंतू ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून लोकांना लाइव्ह सुपरमून बघता येणार आहे. हा यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा आणि चमकदार फुल मून असणार आहे. त्यामुळे या सुपरमून बाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. एप्रिल महिन्यातील पौर्णिमा ही साधारणा गुलाबी रंगात दिसते त्यामुळे याला सुपर पिंक मून असेही म्हटले जाते. याच वर्षातील आतापर्यंतचे शेवटचे सुपरमून ९ मार्च ते ११ मार्चच्या दरम्यान दिसले होते. मार्चमध्ये दिसलेल्या त्या मूनला सुपर वॉर्म मून म्हटले होते.

हेही वाचा –

कोरोनाच्या आव्हानासाठी पंतप्रधानांची सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा

First Published on: April 5, 2020 5:07 PM
Exit mobile version